गेवराई, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पञकार संघ,मुंबई आयोजित येत्या १६ मार्च शनिवार रोजी पुणे येथे राज्यस्तरीय दोन दिवशीय अधिवेशन होत आहे.या अधिवेशनास गेवराई तालुक्यातील पञकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गेवराई पञकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे यांनी केले आहे.पुणे येथील अधिवेशन राज्यातील पञकार बांधवाच्या विविध आडी अडचणीवर या अधिवेशन विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.प्रति वर्षाप्रमाणे होत असलेल्या या अधिवेशनास गेवराई येथील पञकारांची आजवर लक्षणीय उपस्थिती असते.गेवराई तालुक्यातील पञकारांनी या अधिवेशना उपस्थित राहावे या बाबत पञकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे व सर्व सदस्य याची जय्यत तयारी करत आसल्याचे दिसुन येत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार पञकार संघ,मुंबई आयोजित राज्यस्तरीय पञकार संघाचे दोन दिवशीय अधिवेशन पुणे येथे पार पडणार आहे.१५ मार्च शुक्रवार रोजी राज्यातील पञकार संघाचे जिल्हाध्यक्षांची बैठक देखील पुणे येथे होणार आहे.तर १६ मार्च शनिवार रोजी सकाळी राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन,दुपारी चर्चासत्र व सांयकाळी समारोप होणार आहे.हे सर्व कार्यक्रम पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.राज्यस्तरीय अधिवेशनात पञकारांच्या विविध आडी अडचणीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.पुणे येथे १६ मार्च रोजी होणा-या राज्यस्तरीय अधिवेशनास गेवराई तालुक्यातील पञकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही अधिवेशनास गेवराई तालुक्यातील पञकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गेवराई तालुका पञकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष सुनिल पोपळे,बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मुंडे,गेवराई शहराध्यक्ष कैलास हादगुले,उपाध्यक्ष भागवत देशपांडे,राजेंद्र नाटकर,सचिव तुळशीराम वाघमारे,कार्याध्यक्ष अनिल आगुंडे,कोषाध्यक्ष सुदर्शन देशपांडे,सदस्य सचिन नाटकर,ज्ञानेश्वर जाधव,अरविंद कुलकर्णी,रामहरी काकडे व मधुकर फुले आदिनी केले आहे.या अधिवेशनास गेवराई तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असुन या अधिवेशना निमित्त गेवराईत जय्यत तयारी करण्यात येत आसल्याची माहिती पञकार संघाचे अध्यक्ष अंकुश आतकरे यांनी दिली आहे.
Home Uncategorized पञकार संघाचे पुणे येथे अधिवेशन गेवराईतील पञकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे :...