बीडकरांनी आवर्जून उपस्थित रहावे :- रोहिणीताई गणेश माने
बीड : दि.८( प्रतिनिधी ) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांना रयत सामाजिक प्रतिष्ठानचा पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला असून, उद्या दि.१० मार्च रोजी महाराष्ट्रातील नामवंत
चित्रपट कलावंत व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे, या पुरस्कार वितरण सोहळ्यास बीडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणीताई गणेश माने व प्रतिष्ठानने केले आहे .
रयत सामाजिक प्रतिष्ठान हे अल्पावधीतच महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले सामाजिक प्रतिष्ठान आहे. रयत सामाजिक प्रतिष्ठान हे संपूर्ण महाराष्ट्रात समाजकार्यात अग्रेसर असते, रयत च्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गोर गरीब, कष्टकरी, वंचित घटकांना मदत कार्य तर केलेच जाते परंतु समाजकार्यात सुध्दा रयत प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. रयत म्हणजे सर्व समाज या शब्दाशी प्रेरीत होऊन गणेश माने यांनी रयत नावाचे प्रतिष्ठान असावे आणी या रयत नावाच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब, दिन ,वंचित, शोषितांचे दु:ख दुर करण्यासाठी कार्य घडावे हा मनोदय व्यक्त झाला आणी समाजाप्रती आपलं काही देणं लागतं हा उदात्त हेतु असणार्या युवकांनी रयत प्रतिष्ठान नावाचे हे प्रतिष्ठान उभे केले. आज रयत प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर शाखा असुन जवळपास 5000 च्या वर सभासद आहेत. रयत प्रतिष्ठान च्या माध्यमातून समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक, नगरसेवक, समाजसेवक, डाँक्टर, सिने कलावंत, नाटय कलावंत, वकिल, उद्योजक, व्यापारी, आर्मी आँफीसर, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. हा पुरस्कार. सोहळा गत 3 वर्षापासून रयत प्रतिष्ठान घेत असुन यंदाचे हे पुरस्कार. सोहळयाचे 4 थे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा हा गत सालांच्या पुरस्कार सोहळयापेक्षा आगळा वेगळा असणार आहे, कारण 10 मार्च दुपारी 12 वाजता डाँ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन नगर रोड बीड येथे होणार्या या पुरस्कार सोहळयासाठी अनेक सिनेकलावंत , सिने अभिनेत्री ,डाँक्टर, आर्मी आँफीसर, शिक्षक , समाजसेवक, पत्रकार , संपादक अशा विविध मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये बाजीराव मस्तानी फेम गायक आणी बीडचे भूमिपुत्र असणारे प्रा.गणेश चंदनशिवे, प्रख्यात सिने कलावंत लक्ष, खाकी,द्रुश्यम या सिनेमातील कलाकार कमलेश सावंत सर, दिग्दर्शक तथा सिने लेखक डाँ. सुधीर निकम सर, जेष्ठ पत्रकार उत्तम हजारे,समाजसेवक तथा नगरसेवक शुभम भैय्या धुत,प्रख्यात कथा लेखक संदीप खुरुद् ,आर्मी आँफीसर दिपक ढोले, आर्मी आँफीसर अनिल काकडे, महिला पत्रकार गितांजली लव्हाळे, आर्मी आँफीसर सुनिल काकडे,दै.लोकांकीत मुंबईचे संपादक संजय पवार, सिनेकलावंत महेंद्र खिल्लारे, सिने अभिनेत्री राणी मस्के, डायरेक्टर प्रविण वडमारे, सिने अभिनेत्री श्वेता भांमरे, शिक्षक वैजीनाथ माने, नगरसेवक विकास जोगदंड, शाहीर विलास बापु सोणवणे ,संगीतशास्राचे प्राध्यापक तथा गायक जमदाडे ,उसतोड कामगार हजारै ताई यांच्या सह अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, रयत सामाजिक प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रंगतदार होण्याकरिता गणेश माने, सिने अभिनेते महादेव ( म्यडी ) सवाई ,विठ्ठल मूर्केवार सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी,राजेश दादा खर्डे, कैलास दादा पठारे ज्येष्ठ समाजसेवक, लक्ष्मण लटपटे ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,संतोष कुराडे, सामाजिक प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बीड, प्रा. सुरेंद्र कांबळे सर ,ॲड,रंजीत वाघमारे, उदय देशमुख, गणेश तालखेडकर,प्रमोद रामदासी, ॲड अविनाश गंडले साहेब,अभिनेते संतोष वारे,अभिनेते तुषार जाधव,समाजसेवक बाजीराव ढाकणे,समाजसेवक गिरी साहेब,मीनाक्षी देवकते या सर्व पदाधिकारी व सभासदांची हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. उदया होणार्या या रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहयासाठी बीड शहरातील नागरिकांना मोठया संख्येने यावे आणी या पुरस्कार सोहळयाची शोभा वाढवावी असे आवाहन रयत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहीणी ताई गणेश माने व रयतचे सोशल मिडीयाचे प्रमुख सिने अभिनेते महादेव ( म्यडी ) सवाई व सर्व पदाधिकारी सभासदांनी केले आहे .