“आणि हस्तक्षेप असावा किंवा नाही या विषयावर थोडक्यात विचार”….!!.
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतींची बांधणी अतिशय शास्त्रशुध्द पध्दतीने केलेलीं आहे. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे भारतीय परंपरेतील खूप मोठी देणगी आहे. आणि ही परंपरा जोपासली जाणें अत्यावश्यक आहे.
नवीन लग्न होऊन गेलेल्या मुलीला जन्माला आल्यापासून माहेरघर चे संस्कार संस्कृती जोपासण्याची सवय झालेली असते. आणि लग्नानंतर सासरी गेली तिथल्या परंपरा. या गोष्टींचा काहिसा त्रास होतो, पण दोन्ही परीवार जर योग्य विचारसरणी तील असतील तर संसार सुखाचा नाही तर मग उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. त्या मुलीला सगळं काही नवीन अनुभवायला लागतं. इकडे ती कोणाची सुन, वहिनी, काकी, मामी, अशा अनेक नात्याने बांधल्या गेलीं असते. तिच्या साठी सगळे काही नवीन, नवख्या नात्यांना आपलंसं करावं लागतं. जबाबदारी संपूर्णपणे स्वीकारली तरचं ठीक नाही तर मग तिच्या कुळाच्या उद्धाराकरिता अनेक जण टपलेले असतात. दोन्ही घराची मान मर्यादा ही तीच्या डोक्यावर येऊन ठेपली असतें. या परिस्थिती मध्ये तिला मानसिक दृष्ट्या मजबूत आधार हवा असतो. आणि तो आधार नक्कीच तीच्या पतीचा असेल तर जग जिंकण्यास वेळ लागतं नाही. जर कुठे कमतरता असेल तर मग तिची आई तर असतेच. कारण जन्माला आल्यापासून ती तिची मुलगी सखी मैत्रीण सगळे नातें निभावत आलेली असते. म्हणून मायलेकी चे बंध खूप घट्ट झालेले असतात.
मुलीला तिच्या संसारात रूजलेली पाहून कोणत्याही आईवडीलांना आनंद तर होणारच. पण जर तसं नसेल तर मग मुलगी वादविवाद माहेरी घेऊन येणार आणि मग ही सुरुवात होते....!!
प्रथमतःच आईवडिलांचे कर्तव्य म्हणजे मुलीला समजूतदार विचारसरणी , सामजष्याची अवगत करून देणे. व तीला परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम बनविणे. हे जर आपण केलें तर तीच्या संसारात लुडबुड करायची वेळ येणार नाही .
काही कारणास्तव जर तशी वेळ आली तर मात्र ह्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मगं मात्र मुलींच्या आईला सहभाग घ्यावा लागतो, प्रत्येक आईला मुलींची काळजी वाटते, पण ह्या काळजी च रूपांतरण कारस्थानात बदलू नये. आईने तिला पती व त्यांच्या परिवाराला सोडून राहायला हवे अशा भावनेपासून दूर ठेवले पाहिजे.
- संसार टिकवता ना घ्यावयाची काळजी…* विवाह हा एक संस्कार आहे. सहजीवनाची, नवनिर्मितीचा प्रारंभ आहे. विवाह एक बंध आहे. दोघांच्या मनाची गुंफण आहे. काळ किती जरी बदलला, पर्याय किती जरी आले तरी या संस्काराला तडा जाणार नाही ही काळजी घेणे .
सध्या विवाह जुळविणे जितके किचकट, कठीण आहे तितकेच विवाह टिकवणे ही कठीण झाले आहे. काडीमोड (घटस्फोट) घेण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. सामंजस्य पणाचा अभाव हे काडीमोड चे प्रमुख कारण आहे.विवाह करण्यापुर्वी चौकशी केली जाते त्याशिवाय विवाहाचं केला जातं नाही. घाईगडबडीत कुणाचाच विवाह होत नाही. विचार-विनिमय करुन, पसंती-नापसंती खुलेपणाने विचारून विवाह केला जातो. सध्यातरी विवाहापूर्वी उपवर मुलगा व मुलगी बोलतात, विवाह ठरल्यावर भेटत असतात. प्रेम विवाह करण्यापुर्वी अनेकवेळा गप्पा होतात. स्वभाव कळलेला असतो. अपेक्षा, आवडी-निवडी समजलेल्या असतात. परिस्थिती समजलेली असते. उत्पन्न, उत्पन्नाचा स्त्रोत माहित असतो. तरीही काडीमोड होतो कसा? परिस्थितीनुरूप समजून न घेतल्यामुळे वाद होतात. हे वाद अति टोकाला जातात. एकमेकांसोबत बोलायची इच्छा होत नाही, रहायची इच्छा होत नाही, एकमेकांना पहायची इच्छा होत नाही. ही धुसफूस अनेक दिवस, अनेक महिने सुरू राहते, शेवटी याचे पर्यावसान काडीमोड मध्ये रुपांतर होते.
काडीमोड होऊ नये, विवाह टिकावा यासाठी काय दक्षता घ्यावी…. १) दोघांनी एकमेकांना समजावून घ्यावें.
२) कोणत्याही बाबीसाठी हट्टी राहू नये.
३) एकमेकांना कमी समजू नये.
४) वाद टोकाला जाऊ देऊ नये. कुणीतरी एकाने गप्प बसावे. दोघांनी वाद मनात धरून ठेऊ नये.
५) राग हा क्षणिक असतो. तो वेळ जाऊ द्यावा.
६) कुणाचे तरी ऐकूण वाद घालू नये. विश्वासाने समोरासमोर चर्चा करावी. कुणाचे चुकत असेल तर स्पष्ट शांतपणे चूक सांगावी. चूक कशी सुधारावी ते ही एकमेकांना सांगावे, अनेकवेळा सांगावे. वाद मनात न ठेवता तिथल्या तेथे मिटवून परत सुसंवाद सुरू करावा.
७) पालकांनी तटस्थ रहावे. विशेष म्हणजे दोघांना हि
८) एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्यावा. गप्पा माराव्यात, फिरायला खरेदीला एकत्र जावे.
९) मिळकत व खर्च यामध्ये पारदर्शकता असावी. दोघांनी यावर चर्चा करावी.
१०) दोघांच्या किंवा इतरांच्या मिळकतीची तुलना करू नयेत.
११) गंभिर आजारात धीर द्यावा. नाकारू नये.
१२) नवीन वस्तू, वास्तू, दागिने, सेवा खरेदी करताना एकमेकांचा सल्ला विचारात घ्यावा.
हे जर आपल्या संस्कारातून आईने मुलीला घडवले तर सांसारिक वाईट प्रसंग वेळीच टळणार यांत तिळमात्र शंका नाही
या सगळ्या गोष्टींचा विचार करणं ठीक आहे....
पण मला वाटते सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे “विश्वास” आणि फक्तं एकमेकांवर अतुट विश्वास असेल तर नातें कुठल्याही परिस्थितीत कोणी ही तोडू शकणारं नाही…..
सौ. उज्वला गुरसुडकर
नांदेड प्रतीनीधी
9764887662
Ujjwala gursudkarujjwala@gmail.com