गेवराई (प्रतिनिधी)एकादशीच्या दिवशी दि.7मार्च फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने शहरातील काही भागात अनेकांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शहरातील मुख्य भागात असलेल्या शास्त्री चौकातील किराणा दुकानांतून भगर खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली या बाधितांना गेवराई येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाधित 3 च्या आसपास आहेत एकादशी असल्याने भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. शहरातील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.दिवसेंदिवस होत असलेल्या या घटनेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे भगरीतून विष बाधा होणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणे असाच प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे अन्नपुरवठा भेसळ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेवराई शहरातील सर्व किराणा दुकानाकडे लक्ष घालून होत असलेली विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी होत आहे.