बीड प्रतिनिधी :
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची कार्यशाळा व जनजागती मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले सास्कतीक सभागृह फातीमा नगर वानवडी पुणे येथे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेड्रेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता करण्यात आलेले आहे.
केंद्र शासनाने हस्त कौशल्य, अवजारे व साधनांचा उपयोग करुन उत्पादन व सेवा देणा-या बलुतेदार, हस्तकला कारांगीराना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वांगीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातुन प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे.
सदर योजनेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन राज्यातील अनेक कारागिरांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे त्या प्रमाणात पुणे जिल्हाची नोंदणी अत्यल्प आहे सदरची नोंदणी वाढवण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्या मध्ये मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. आर. विमला (भा.प्र.से.) या मार्गदर्शन करणार आहेत. तरी सदर मेळाव्यास जास्तीत-जास्त कारागिरांनी उपस्थीत राहुन नाव नोंदणी करावी. आपला लाभ निश्चित करावा असे आवाहन श्री. शिवाजीराव आदमाने, अध्यक्ष पुणे जिल्हा फेड्रेशन ग्रामोद्योग सहकारी फेड्रेशन, पुणे व जिल्हा ग्रामोद्योग आधिकारी पुणे यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.