छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबीर :टायगर ग्रुप चा स्तुत्य उपक्रम

0
234

गेवराई (प्रतिनिधी)गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ.तानाजी भाऊ जाधव, मुंबई प्रदेशाध्यक्ष पै.संजय भाऊ खंडागळे यांच्या आदेशानुसार तसेच टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष पै. उमेश भाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व टायगर ग्रुप बीड जिल्हा सदस्य संकेत (भाऊ) गांगुर्डे यांच्या सहकार्याने हा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते प्रकाशजी भोले, रिपाइं तालुकाध्यक्ष किशोरजी कांडेकर, प्रहार संघटना तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार, बीड राज्यकर्ता चे संपादक अमोल वैद्य, बाबाभाई शेख यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. उपस्थित युवकांना अतिशय तळमळीने मोलाचे मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांनी केले.हा स्तुत्य उपक्रम अतिशय महत्त्वाचा घटक रक्तदान हे सर्वोत्कृष्ट दान आहे आणि हा यशस्वी कार्यक्रम करणारे आयोजकांचे देखील कौतुक केले. यावेळी उपस्थित उमेश सर परदेशी, अकाश सोनमाळी,शहादेव वाघमारे, अकाश जाधव,राहुल कांबळे, अयुब बागवान, ज्ञानेश्वर वैध्य,अजय अगलावे,किरण भोसले,रविंद्र पांडे,शुभम कदम,बाबासाहेब मोरे,माऊली भिसे,राम सोलाट,संदिप भाऊ, प्रशांत सिरसट,रविराज साळवी, अजय डोंगरे,सुदाम मोरे,रोहित कांबळे, आदींनी रक्तदान केले यावेळी छावा संघटनेचे राहुल जी चाळक ,राहुल कांडेकर ,रुषिकेश डोळस, अकाश लोखंडे, सुनील खाडे,बालाजी माने,श्रावण शेवाळे,क्रिष्णा हतागळे,आदी टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते. टायगर ग्रुप बीड जिल्हा सदस्य संकेत भाऊ गांगुर्डे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here