आष्टी प्रतिनिधी
टिळक पत्रकार भवन,डॉ.जुल्फी शेख स्मृती परिसर,नागपूर येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील बहुभाषिक कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी आष्टी,जिल्हा बीड येथील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांची निवड झाली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रा.फरझाना डांगे भूषविणार असून,नितीन दादा सरदार हे उद्घाटन करणार आहेत.या साहित्य संमेलनात परिसंवाद,कवी संमेलन,काही मान्यवरांचा सत्कार,पुस्तक प्रकाशन सोहळा,समारोप असा विविध अंगी कार्यक्रम होणार आहे.डॉ.मेघनाथ सहा सांस्कृतिक विचार मंच,फुले,शाहू,आंबेडकर विचार मंच, भारतीय मुस्लिम परिषद,छवी पब्लिकेशन नागपूर,आयोजित राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी प्रा.जावेद पाशा,प्रा.रमेश पिसे,प्रा.डॉ.असलम बारी, प्रा.शकील अहमद,डॉ.वाहित पटेल,शकील पटेल,ताहिरा शेख,डॉ.ममता मून,नेहा गोडघाटे याआमंत्रकासह संयोजक समित परिश्रम घेत आहे.