विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश :गोदावरी पात्रातील बॅरेज मध्ये पाणी सोडण्यास सुरुवात

0
459

गेवराई (प्रतिनिधी) दि. १६ : दुष्काळ आणि टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गोदावरी नदी पात्रातील उच्च पातळी बंधाऱ्यात (बॅरेज) मध्ये पाणी सोडण्यासह फेब्रुवारी नंतर एप्रिल आणि मे महिन्यात कालव्यातून पाण्याचे दोन आवर्तने सोडण्याची मागणी बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज शुक्रवार दिनांक १६ फेब्रु पासुन गोदावरी नदी पात्रातील उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. गोदा काठावरील शेतकरी, ग्रामस्थ आदींनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. तर पाणी जपुन वापरण्याचे आवाहन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता त्या बाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टिने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदी काठावरील सर्व ग्रापंचायतीचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि जायकवाडी प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नदी पात्रातील उच्च पातळी बंधाऱ्यात (बॅरेज) पाणी सोडण्याची मागणी केली होती. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयासह फेब्रुवारी, एप्रिल आणि मे महिन्यात कालव्यातून पाण्याचे आवर्तने सोडण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आज शुक्रवार दिनांक १६ रोजी सकाळी पैठण उजवा कालव्यामधून मंगरूळ उच्च पातळी बंधाऱ्यात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर गुळज वितरीकेतून शहागड बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती विजयसिंह पंडित यांनी दिली आहे.

या निमित्ताने बोलतांना विजयसिंह पंडित म्हणाले की, आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी, बीड यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्यासाठी पाणी सोडणे बाबतचे निर्देश जायकवाडी प्रशासनाला दिले आहेत. जायकवाडी धरणातून नदी पात्रातील शाहगड आणि मंगरूळ उच्च पातळी बंधाऱ्यात पैठण उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे तर उर्वरीत उच्च पातळी बंधाऱ्यात (बॅरेज) डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी प्रशासनाने तसे नियोजन केले असून आज सकाळी या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पुढे बोलतांना विजयसिंह पंडित म्हणाले मराठवाडयाच्या हाक्काच्या पाण्यासाठी यापूर्वी जनआंदोलन केल्यामुळे शासनाने उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तीन पाळ्या देण्याचा निर्णय झाला आहे, त्यानुसार फेब्रुवारी मध्ये पहिली पाळी, एप्रिल मध्ये दुसरी पाळी व मे मध्ये तिसरी पाळी सोडण्यात येणार असुन प्रशासनाने याबाबतची मागणी मान्य केली आहे.

जायकवाडी धरणाच्या पैठण उजवा कालवा, वितरीका व उपवितरीका मधून पिण्यासाठी व शेतीसाठी सध्या पाणी सोडण्यात आले आहे. तसेच गोदावरी नदीवरील गुळज, शाहगड, जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी यासह अन्य उच्च पातळी बंधाऱ्यात (बॅरेज) पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामूळे आपण केलेल्या मगण्या मान्य झाल्या असल्याची माहिती विजयसिंह पंडित यांनी दिली. गोदावरी नदी काठावरील शेतकरी, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांनी विजयसिंह पंडित यांचे आभार मानत करत आनंद व्यक्त केला आहे.

               *चौकट*

काटकसरीने पाणी वापर करावा – अमरसिंह पंडित

माणसानं बरोबर जनावरांच्या पिण्या साठी सध्या पाणी सोडण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आणि भविष्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here