गेवराई :
गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथील युवा उद्योजक जयराम जाधव यांना स्विफ्टएनलिफ्ट प्रेझेंट यांच्या वतीने मुंबई उद्योजक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यासाठी मराठी सिने अभिनेत्री पुजा सावंत, स्विफ्टएनलिफ्टचे सीईओ निलेश साबे यांच्या सह आदि मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार सोहळ्याचे स्विफ्टएनलिफ्टचे यांच्या वतीने टिपटॉप हॉटेल, ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. २०२४ चा मुंबई उद्योजक अवॉर्ड गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथील रहिवासी व गेवराई येथील साईश्रद्धा ट्रेलरचे प्रोप्रायटर जयराम जाधव यांंना प्राप्त झाला.
यावेळी समवेत त्यांचे वडील लक्ष्मणराव जाधव, बंधू बाळासाहेब जाधव उपस्थित होते.दरम्यान यावेळी बोलताना जयराम जाधव म्हणाले की, आई-वडिलांच्या प्रेरणेने तसेच कष्ट, जिद्द, आणि मेहनत यांचा संगम झाला तर कुठल्याही क्षेत्रात यश मिळते. हा पुरस्कार हा सन्मान आई-वडिलांच्या चरणी सर्मपित आहे असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.