गेवराई( शुभम घोडके) शहरातील संताजी नगर भागात विविध विकास कामांचा शुभारंभ दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११वाजता करण्यात आला. असुन शहरातील विविध भागात मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी रस्ते ,नाली, पाणी, लाईट यासारख्या अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. तसेच शहराच्या विकासासाठी युवा नेते बाळराजे पवार आणि आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा रथ पुढे चालवत राहु असे प्रतिपादन शिवराज पवार यांनी केले.
गेवराई शहराला विकासाचे मॉडेल करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे तर सर्वांनी एकत्रित येऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणे गरजेचे आहे पवार परिवाराला नेहमीच शहरातील मतदान रुपी आशीर्वाद दिले आहे शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास कामे मोठ्या जोमाने करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलें आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपण ह्या विकास कामांचा दर्जा अधिक दर्जेदार व्हावा म्हणून सातत्याने स्वतः लक्ष घालून जबाबदारीने काम करीत आहोत. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष सुशील भाऊ जवंजाळ, नगरसेवक कृष्णा काकडे, अप्पासाहेब कानगुडे,सुरज जाधव,महेंद्र जवंजाळ, इंजिनीयर चाळक साहेब,विशाल कुलकर्णी,राहुल झेंडेकर,कैलास पट्टे,गणेश मोटे,बाबाराजे खरात,अजय जवंजाळ,कृष्णा पाटोळे,अमोल कापसे यांची उपस्थिती होती.