बीड,
सन 2023-24 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद स्वतच्या उत्पनातुन दिव्यांग कल्याणार्थ राखीव 50 टक्के निधीमधून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविणे व स्वत:चा रोजगार उपलब्ध होण्यासाठी झेरॉक्स मशिनचा पुरवठा करणे ही योजना राबवायची असून मुकबधीर व आस्थिव्यंग प्रवर्गातील 40 टक्के व त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग स्त्री – पुरुषांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावीत. आधारकार्ड,मतदानकार्ड, अस्थिव्यंग व मुकबधीर दिव्यांगाचे प्रमाणपत्र (40 टक्यापेक्षा जास्त), रहिवाशी पुरावा (ग्रामसेवक यांचे), बॅक पासबुक (राष्ट्रीयकृत बँकेचे),शौचालय वापरात असल्याबाबत स्वयंघोषित प्रमाणपत्र,लहान कुटुंबाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र,उत्पन्नाचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे 90000 मर्यादेत), बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे) व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक यांचे) सदर योजना ही 100 टक्के अनुदान तत्वावर असून गटविकास अधिकारी, पंचायत समिती संबंधित यांच्या कार्यालयात दि. 7 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीपर्यंत केवळ ग्रामीण भागातील अर्ज स्विकारले जातील. सदर योजनेचा लाभ गरजू दिव्यांग लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके व जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एम. शिंदे यांनी केले आहे.