गेवराई( प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई येथे करिअर कट्टा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल च्या विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण अभ्यास, प्रयत्न व स्वतःतील न्यूनगंड दूर करून यश संपादन करता येते असे प्रतिपादन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक शुभम कोरडे यांनी नमूद केले. प्रथम कोरडे यांनी महाविद्यालय विविध उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत होणारा लाभ यावर विचार मांडले. पुढे बोलताना त्यांनी महाविद्यालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपला दैनंदिन नित्यक्रम ठरवून अभ्यास व चर्चा कराव्यात. याशिवाय विविध अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत मांडले. पुढे मार्गदर्शन करताना ‘मी कसा घडलो’ यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रभावी उत्तर देऊन समाधान केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांनी अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याच्या माध्यमातून आपले करिअर घडवून जीवनात यशस्वी व्हावे असे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण भराडे तर प्रास्ताविक डॉ. हनमंत हेळंबे आभार डॉक्टर दीपक डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. अमोल सिरसाठ, डा. प्रदिप दहिंडे प्रा. शरद सदाफुले यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.