आष्टीजवळ जोडप्याला आडवून बेदम मारहाण;पतीसमोरच महिलेवर अत्याचार

0
1585

आष्टी :

अहमदनगर वरून गावाकडे दुचाकीवरून जात असताना तीन अज्ञात लोकांनी रस्त्यात अडवून जोडीदाराला बेदम मारहाण करत 38 वर्षीय महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर घडली आहे.महिला व तिच्या जोडीदारावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले एक जोडपे गुरूवारी कामानिमित्त अहमदनगर ला गेले होते.रात्री उशिरा गावाकडे येत असताना बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर अज्ञात तिंघाजणांनी दुचाकी अडवत जोडीदाराला बेदम मारहाण करत महिलेला देखील मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना घडली आहे.ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पण अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलिस अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सदरील जोडपे गावाकडे जात असताना तीन लोकांनी मारहाण केली व महिलेवर अत्याचार झाल्याचे ती सांगत आहे. पोलिस जबाब नोंदवून घेण्यासाठी गेले असून नेमक घटना काय आहे.हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समजेल. अत्याचार झाल्याचे महिला सांगत आहे.असे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here