आष्टी प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील चोंडी येथे जन्मल्या.पुढे चोंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात समाविष्ट करण्यात आले.जालना जिल्ह्यातील परतूर येथील विद्युत बोर्डातील एक लाईनमन कवी भिवराजी आढाव यांच्या मनात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी खूप अभिमान होता.म्हणूनच त्यांनी त्यांच्या जीवनावर दूरदर्शन माहितीपटाची निर्मिती केली.स्वतःपैसे खर्च केले.चोंडीचा विकास व्हावा म्हणून उपोषणही केले.माहितीपटाच्या सर्व टीमने प्रत्यक्ष चोंडीला जाऊन त्यांचे जन्मस्थळ स्वच्छ केले.जन्मस्थळी काही खणाचे सागवानी माळवत होते.त्यात वटवाघुळांचा संचार होता.हा पहिलाच माहितीपट दूरदर्शनवर दाखवण्यात आला.भिवराजी आढाव यांना मनस्वी आनंद झाला.त्यांचा आनंद गगनात न मावणारा होता.पुढे महाराष्ट्रातील अहिल्यादेवी भक्तांकडून,सरकार दरबारी भिवराजी आढाव यांचा सन्मान व्हायला हवा होता.यांची दखल घ्यायला हवी होती.आज भिवराजी आढाव हायात नाहीत.त्यांच्या तळमळीची उपेक्षा व्हायला नको होती.असे दूरदर्शन माहितीपटाचे दिग्दर्शक मधुकर सोळसे यांनी खंत व्यक्त केली.अविष्कार साहित्य मंडळ परतूर जि.जालना,आयोजित कवी भिवराजी आढाव स्मृति विसावे एक दिवसीय मराठवाडा स्तरीय मराठी साहित्य संमेलनात समारोपप्रसंगी ते बोलत होते.विवेकानंद विद्यालयात दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी लेखक,ज्येष्ठ विचारवंत,डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक डॉ.मुरहरी केळे यांच्या उपस्थितीत प्रा.छबुराव भांडवलकर यांनी भिवराजी आढाव यांच्यावर लिहिलेल्या धनगराच पोर या चरित्र ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.प्रसिद्ध कथाकार राम निकम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन,प्रा.डॉ.महेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन आणि दिग्दर्शक मधुकर सोळसे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.उपस्थित पाहुण्यांना दूरदर्शन माहितीपटाच्या सीडी भेट देण्यात आल्या.महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करते प्रा.रामेश्वर नरवडे आणि त्यांच्या संचाने बहार उडवून दिली.निमंत्रक श्रीमती लक्ष्मीबाई भिवराजी आढाव,मासिक अहिल्या ज्योतचे संपादक रमेश आढाव, कार्यकारी संपादक सुरेश आढाव यांनी अथक परिश्रम घेतले.संमेलनाचे हे विसावे वर्ष आहे.प्रा.रावसाहेब ढवळे,प्रा.बसवराज कोरे यांची विशेष उपस्थिती होती.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2024/01/IMG_20240118_193540-1024x831.jpg)