गेवराई तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – आ.लक्ष्मण पवार

0
227

राष्ट्रीय महामार्गा२२२ ते सिरसमार्ग डांबरी रस्ता कामांचा आ.लक्ष्मण पवारांच्या हास्ते उद्घाटन संपन्न

गेवराई, (प्रतिनिधी) महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली तेव्हा पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील दळणवळणा साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे मिळालेला निधीचा योग्य वापर करून मतदारसंघातील दळणवळणा मार्ग सुकर झाला असल्याचे आ. पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले
ते म्हणाले की आपण आणलेला निधी जनतेच्या उपयोगी आला पाहिजे म्हणून काम कोणत्याही गुत्तेदाराने करु आपण दर्जाशी तडजोड करत नाहीत त्यामुळे आपण मंजूर करून आणलेले काम दर्जेदार झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी दिली आहे
राष्ट्रीय महामार्गा २२२ ते शिरसमार्ग चार कि .मी. आठ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आ. लक्ष्मण अण्णा पवार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी असल्याचे यावेळी आ.पवार म्हणाले. कार्यक्रमास युवा नेते शिवराज दादा पवार, पंचायत समिती सदस्य अनिल काका पवळ, धुराजी महाराज कोळेकर, सरपंच सुरेश मार्कड, चेअरमन दिनेश गुळवे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पवार, चेअरमन संदिप आंधळे, राम पवार, संदिप ढगे यांची उपस्थिती होती.
शिरसमार्ग येथे नारायण गडचा नारळी सप्ताह आहे. या अनुषंगाने शिरसमार्ग फाटा ते शिरसमार्ग डांबरी रस्ता करावा अशी शिरसमार्गसह परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीचा विचार करून आ. लक्ष्मण अण्णा पवार यांनी या रस्त्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला. या रस्त्याचे बुधवारी आ. पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आ. पवार म्हणाले की विकासासाठी राज्य सरकारने मोठा निधी दिला आहे. या निधीतून विकासकामे सुरू आहेत. विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध असल्याचेही यावेळी आ.पवार म्हणाले. यावेळी शिरसमार्गसह पोखरी, तरटेवाडी, दिमाखवाडी, उक्कडपिंप्री, सावरगाव, मादळमोही, काळगावसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here