गेवराई (प्रतिनिधी) ताक्यातील खेर्डावाडी येथील ऊसतोडणीसाठी गेलेल्या कुटुंबांच्या घराला दि. १० रोजी भरदुपारी अचानक आग लागल्याने कुडाच्या घरात राहत असलेल्या वाल्हबाई शहाजी भिसे वय ९० वर्षे या वयोवृध्द महिलेचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पाच कुटुंबाच्या संसाराची पूर्णत: राख झाली असून या कुटुंबांना तात्काळ अपत्कालीन निधी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे की खेर्डावाडी ता. गेवराई जि. बीड येथील मीरा भिसे, ज्ञानेश्वर भिसे, बळीराम भिसे, नितिन भिसे, मारोती भिसे व मिलिंद भिसे हे ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी गेले असता दि. १० रोजी दुपरच्यावेळी अचानक आग लागल्याने घराची राखनदारी व लेकरांना सांभाळण्यासाठी घरी असलेल्या वाल्हबाई भिसे यांचा या आगित जळून दूर्दैवी मृत्यु झाला. सुदैवाने लेकरे शेतात कामानिमित्त गेले होते म्हणून बचावली. यातील काही लोक भूमिहीन असून कोणालाच पक्के घर नाही, सर्वांची घरे हि कुडाची व पत्र्याचे शेडची आहेत त्यामुळे आगीने त्या सर्व घरांना विळख्यात घेतल्याने घरातील रोख रक्कम, अन्नधान्य, महत्वाची मुळ कागदपत्रे, कपडे यांची जळून राख झाली आहे,राहण्यासाठी व कसून उदरनिर्वाह करण्यासाठी जमीन नसल्याने नाइलाजाने ऊसतोडणीसाठी जावे लागत असल्याने, लेकरांच्या अरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे, या सर्व अडचणींना तोंड देत असतांना दि. १० रोजी लागलेल्या भिशन आगीत सर्व घरे जळाल्याने पाचही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तरी या कुटुंबातील लोकांना शासनाने तात्काळ विविध योजनांचा लाभ देऊन अर्थीक तसेच ईतर उपाययोजनांची अपत्कालीन मदत द्यावी व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतिने तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांनी तहसीलदार गेवराई यांना दि. १७ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Home Uncategorized ऊसतोडणीसाठी गेलेल्या कुटुंबातील वयोवृध्द महिलेचा आगीमुळे दुर्दैवी मृत्यु, संसाराची झाली राख ...