गेवराई प्रतिनिधी
गोदापात्रातून अवैध वाळु वाहतुक होत बोंब होत असल्याने प्रशासकीय कामा काज पहावून गेवराई चे तहसिलदार संदिप खोमने हे गोदावरीला पहारा देत असून शनिवार रोजी रात्री ११:५० वाजता अवैध वाळु वाहतुक करणारी गाडी येत असल्याची गुप्त माहिती मिळताच सापळा रचून राक्षसभूवन फाटा येथे वाहन धरुन जप्त करत कारवाई करण्यात आली असुन या कारवाईत २५ लाखाचे मुद्देमाल जप्त करण्यात महसूल प्रशासना यश मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गेवराई तालुका व्यापक ईस्तरावर मोठ्या प्रमाणात विस्तारलेला असल्याने दररोज मोठ्या संख्येने नागरिक तहसिल कार्यालयात येतात त्याची कामे खोळंबू नये यासाठी फुल टाईम तहसिलदार संदिप खोमणे हे कार्यालयीन कामकाजात वेळ देवून रात्री होणारी अवैध वाळु वाहतुक थांबवण्याचे कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसत आहे.दरम्यान शनिवार दि.६ रोजी रात्री ११:५० वाजता गोदापात्रातून अवैध वाळु वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली असता गोदापात्र परिसरात गस्त घालत असतांना सापळा रचून राक्षसभूवन फाटा येथे एक हायवा जप्त करत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २५ लाखाचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.या कारवाईने वाळू माफियांचे कबरंडे मोडले आहे.सदरिल कारवाई जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी त्रिभून कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सदिरल कारवाईत मंडळअधिकारी आघंळे,बाळासाहेब पखाले,जितेंद्र लेंडाळ,तलाठी देशमुख ,किरण दांडगे सह महसूल चे कर्मचारी सहभागी होते.