आष्टी प्रतिनिधी
अविष्कार साहित्य मंडळ,परतूर जि.जालना आयोजित,कवी भिवराजी आढाव स्मृती विसावे एक दिवसीय मराठवाडा स्तरीय साहित्य संमेलन शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024,रोजी ज्येष्ठ विचारवंत,लेखक,साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली परतूर येथे विवेकानंद विद्यालय,शासकीय विश्रामगृहासमोर,स्वर्गीय अरुणराव बागल पाटील साहित्य नगरीत होणार आहे.याचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक,प्रसिद् साहित्यिक,डॉ.मुरहरी केळे यांच्या हस्ते होणार आहे.अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत धनगराच पोर चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.डॉ.प्रतिभा गोरे,संजय सरग,प्राचार्य डॉ.भारत खंदारे,एम.टी.सुरवसे,चंद्रकांत खाडे,शिवाजी तिकांडे,मनोहर खालापुरे,विश्वनाथ लहाने,आर्.एन.सोनत,एस बी मठपती, विजय रावणकर,बालासाहेब आकात, गुलाबराव नजन,दीपक माने,भाऊसाहेब देशमुख यांची विशेष प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.निलेश वसंतराव बेंडाळे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.प्रसिद्ध लेखक प्रा.छबुराव भांडवलकर यांचा विशेष सत्कार होणार आहे.प्रसिद्ध कथाकार,राम निकम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन तर कवी डॉ.महेश खरात यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन तथा प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी जि.बीड येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर दूरदर्शन माहितीपटाचे दिग्दर्शक,मधुकर सोळसे आणि प्रा.कावेरी जीवनराव खुरणे,पाटोदा हे उपस्थित राहणार आहेत.प्रा.रामेश्वर नरवडे आणि संच यांचा महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रमही या साहित्य संमेलनाचे एक खास आकर्षण आहे.कवी कथाकार,साहित्यिक,रसिक,श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मासिक अहिल्या ज्योतच्या मुख्य संपादिका श्रीमती लक्ष्मीबाई भिवराजी आढाव,संपादक,रमेश आढाव,सुरेश आढाव यांनी निमंत्रक या नात्याने आवाहन केले आहे.