बीड, :
स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात बीड जिल्ह्यात मुलांसाठी 6 व मुलींसाठी 6 अशी एकूण 12 वस्तीगृह सुरू करण्यात आली आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच -2020/ प्र.क्र. 286/शिक्षण-2, दि. 15 जून 2021 या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बीड, गेवराई, केज, पाटोदा, परळी वैद्यनाथ आणि माजलगाव या ठिकाणी मुलांचे 1 व मुलींचे 1 असे 100 विद्यार्थी क्षमतेचे 12 वस्तीगृह सुरू करण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ऊसतोड कामगारांच्या इयत्ता 5 वी पासून पुढील अभ्यासक्रमाच्या पाल्यांनी संत भगवानबाबा शासकीय वस्तीगृह योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वस्तीगृहांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बीड यांनी केलेले आहे.
सदर वस्तीगृह प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज हे संबंधित वस्तीगृहांमध्ये उपलब्ध आहेत. वस्तीगृह प्रवेशाकरिता पुढील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा.
संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृह, गेवराई आणि माजलगाव यासाठी गृहपाल के. वाय. बरबडे (9881958674) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वस्तीगृह, बीड, गेवराई आणि माजलगाव यासाठी गृहपाल अमिता जाधव (958882031) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृह बीड यासाठी गृहपाल एन.डी. सराफ (9505079422) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृह, केज यासाठी गृहपाल एस.बी. बनसोडे (9766910411) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृह, परळी वैद्यनाथ यासाठी गृहपाल आर. डी. गव्हाणे (9975206970) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलींची शासकीय वस्तीगृह, केज आणि परळी वैद्यनाथ यासाठी गृहपाल एस.एस.भवरे (7387155771) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलींचे शासकीय वस्तीगृह पाटोदा यासाठी गृहपाल, के. बी. बुटे (8605178255) यांच्याशी संपर्क साधावा. संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वस्तीगृह, पाटोदा यासाठी गृहपाल विनोद वराट (9130314220) यांच्याशी संपर्क साधावा.