गेवराई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सर यांच्या आदेशाने व संतोष मानूरकर व विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शना खाली दैनिक दिव्य मराठीचे गेवराई तालुका प्रतिनिधी सुनिल मुंडे यांची संघाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक सुनिल पोपळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुनील मुंडे यांची बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी तालुका अध्यक्ष अंकुश आतकरे शहराध्यक्ष कैलास हदगुले, उपाध्यक्ष भागवत देशपांडे कार्याध्यक्ष अनिल अगुंडे कोषाध्यक्ष सुदर्शन देशपांडे सदस्य रामहरी काकडे, मधुकर फुले उपस्थित होते या निवडीने सुनिल मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.