सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव

0
246

बीड (प्रतिनिधी)

पुरोगामी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते,पत्रकार असलेले ‘प्रजापत्र’ चे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि वयाच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सेवा गौरव सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दि.२० डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आणि संविधान अभ्यासक सुभाषजी वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख आणि समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सुनील क्षीरसागर हे मागच्या ४ दशकांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. राष्ट्र सेवा दल,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विवेकवादी संघटनांसह हजेरी सहाय्यक संघटना आणि कामगार कष्टकऱ्यांच्या विविध संघटनांमधील सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.’प्रजापत्र’ दैनिकाचे ते संपादक आहेत. त्यांच्या या ४ दशकातील कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि त्यांच्या वयाची एकसष्ठी याचे निमित्त साधून त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजित केला आहे.
बुधवारी दि.२० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बीड शहरातील अमृत मंगल कार्यालयात हा सोहळा होत आहे.यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते सुनील क्षीरसागर यांचा गौरव होणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक सुभाष वारे राहणार आहेत.या कार्यक्रमात सुनील क्षीरसागर यांच्यावरील ‘अवलिया’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्यासाठी सुनील क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष अशोक देशमुख,निमंत्रक दत्ता थोरे,समन्वयक संजय मालाणी यांच्यासह राजकुमार घायाळ,विश्वास खतीब, बी.बी.जाधव, प्रदीप रोडे,मनीषा तोकले,प्रल्हाद दगडखैर,महेश रसाळ,जगन सरवदे,व्यंकटेश वैष्णव,अक्षय केंडे,अतूल कुलकर्णी,वल्लभ कासट आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here