नागपुर प्रतिनिधी
नागपूर- दि १४ डिसेंबर २०२३
रोजी राज्यातील तीन कोटींच्या आसपास असलेल्या बंजारा विमुक्त भटके समाजाच्या प्रलंबित व जिव्हाळ्याच्या मागण्यांसंदर्भात राज्यसरकार सोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती,या बैठकीत सर्व जिव्हाळ्याच्या मागण्यांसंदर्भात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व अभ्यासू उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे. बैठकीत सर्व विषयांवर चर्चा करून अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या निवेदन व मागणीची दखल घेऊन आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी वाडी वस्ती तांड्यावरील बंजारा समाज विकासापासून कोसो दूर आहे, बंजारा समाजाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय न्याय मिळावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय बंजारा परिषदेचे वतीने विविध ठिकाणी मोर्चा,उपोषण, रास्तारोको,जेलभरो अशी अनेक आंदोलने केली आहेत,तरी समाजाच्या मांगण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत होते. राज्य सरकार सोबत एक बैठक आयोजित करण्यात यावी व बंजारा समाजाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य,राष्ट्रीय बंजारा राजकीय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रा.पी.टी. चव्हाण हे मागील दोन महिन्यांपासून प्रयत्न करत होते, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि १४ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आणि यशस्वी देखील झाली.
या महत्वपूर्ण बैठकीला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,धाडसी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,सार्वजनिक अन्न पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ,महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,मृद व जलसंधारण मंत्री ना.संजयभाऊ राठोड,बहुजन कल्याण मंत्री ना.अतुल सावे,रोजगार हमी योजना मंत्री ना.संदिपान भुमरे, आ.नारायण कूचे सह सर्व खात्याचे सचिव तथा वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसंतराव नाईक अर्थिक विकास महामंडळाच्या व बंजारा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी पंचाहत्तर दिवसांपासून औरंगाबाद येथे उपोषण करीत असलेले राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा संघटक राजू राठोड,बंजारा टायगर्सचे अध्यक्ष अशोक राठोड,संभाजीनगर येथील भाजपचे अध्यक्ष विवेकभाऊ राठोड,बेलदार समाजाचे प्रशांत परदेशी यांचा शिष्टमंडळात समावेश होता.बैठकीनंतर बंजारा समाजाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन भाजपचे पदाधिकारी तथा बंजारा समाजाचे अभ्यासू आक्रमक व संघर्षिल नेतृत्व प्रा.पी.टी.चव्हाण यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सादर केले.या बैठकीत बंजारा समाजाच्या खालील मागण्यांसंदर्भात सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा झाली.
वसंतराव नाईक अर्थिक विकास महामंडळाकडून गरजूंना एक ते पंधरा लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज जाचक अटी रद्द करून विनाविलंब मंजूर करावे, महामंडळाला पंधराशे कोटी रुपये भागभांडवल मंजूर देण्यात यावे,राज्यपाल नियुक्त बारा आमदार मधून बंजारा समाजातील एका कार्यकर्त्यांला आमदार करून बंजारा समाजाला सामाजिक व राजकीय न्याय द्यावा,५०० लोकसंख्या असलेल्या तांडा वाडी वस्तीवर स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण कराव्यात, व्हि.जे अ प्रवर्गात घुसखोरी करणार्यांना शोधण्यासाठी एसआयटी ची चौकशी पूर्ववत सुरू करून दोषींवर कठोर कारवाई करावी,बंजारा बोलीभाषेला केंद्राच्या आठव्या सुचित समावेश करून राजभाषेचा दर्जा द्यावा,नागपूर शहरात माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या नावाने अद्यावत सभागृह बांधण्यात यावे, नॉनक्रिमिलिअरचा काळा जीआर रद्द करण्यात यावा,मोदी आवास योजनेचा ओबीसी समाजाप्रमाणे बंजारा,भटके विमुक्त जातींना लाभ देण्यात यावा,महाराष्ट्रातील बंजारा समाजाला तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या धर्तीवर एस.टी प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे, वरील महत्वपूर्ण बैठकीत चर्चेला आलेल्या मागण्या सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक असून सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे,लवकरच या मागण्यांची पूर्तता बाबत घोषणा केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी चर्चेदरम्यान बंजारा शिष्टमंडळाला दिले.
राज्यसरकार सोबत आयोजित बैठकीत बंजारा समाजाच्या सर्व मागण्यांसंदर्भात मुद्देसूद चर्चा झाल्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण आहे. बंजारा समाजाच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,धाडसी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे आभार मानण्यात येत आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/12/IMG-20231216-WA0055-1024x461.jpg)