मुंबई प्रतिनिधी
संत सेनाजी महाराज यांचे जन्मस्थान बांधवगड आहे. आणि त्यांचे मुळ गांव व वंशज हे पंजाब मध्ये आहेत.अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. परंतु वास्तव काय आहे ? तिथली परिस्थिती काय आहे ? संत सेना महाराज यांची तेथील ओळख भगत सेनजी म्हणून आहे. त्यांचे गांव सोहेल टठ्ठी जि.तरणतारण राज्य पंजाब याची माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी हे अभ्यास गट तयार करून दि.२३-१२-२०२३ ते २९-१२-२०२३ या कालावधीत पंजाब दौरा आयोजीत करण्यात आला आहे. या अभ्यास गटात सर्वश्री.दिलीपजी अनर्थे- प्रदेश सरचिटणीस, सुनिलजी पोपळे – प्रदेश संघटन प्रमुख तथा संपादक नाभिक वार्ता , विष्णुजी वखरे – विभागीय अध्यक्ष मराठवाडा , भगवानजी चित्ते – संपादक नाभिक मंच धुळे, लक्ष्मणजी धाकतोडे – विशेष निमंत्रीत, सुधाकरजी आहेर – जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर , बाबासाहेबजी जगताप – जिल्हाध्यक्ष नाभिक कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर , दिलीप विश्वासु – कोषाध्यक्ष – नाभिक कर्मचारी महासंघ , कवी अंजानदास माथूरकर जबलपुरी यांचा समावेश आहे. तसेच दिल्ली येथून जसबीरजी खांबरा – संपादक सेन जाग्रृती पत्रिका हे सहभागी होणार आहेत. या अभ्यास गटाच्या प्रवास दौर्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.