गेवराई :
गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात असुविधेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याबाबत आवाज उठवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णासाठी सर्व सुविधा तात्काळ चालू कराव्यात यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी आरोग्य विभागाला निवेदन दिले होते. यावर आरोग्य विभागाने काहीच निर्णय न घेतल्याने आज मनसेच्या वतीने गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान असुविधा असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक बडे यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच विडिओ द्वारे कशा प्रकारे असुविधा आहेत ते मांडण्यात आले होते. जसे की क्ष-किरण मशीन बंद आहे, सोनोग्राफी मशीन बंद आहे, ट्रामा केअर युनिट बंद आहे, औषधी उपलब्ध नाहीत. डोळ्याचे मोजके ऑपेरेशन होत आहेत. साफसफाई होत नाही, निकृष्ट दर्जा जे चे जेवण दिले जात आहे. तसेच डॉक्टर ओपिडी मध्ये बसत नाहीत, खोट्या मेडिकल रजा तसेच नियमबाह्य गैरहजर राहतात या बाबत या निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. तसेच गेवराई उपजिल्हा रुग्णालयात स्वतः जाऊन या बाबत तेथील डॉक्टरांना व अधिक्षक यांना सांगितले होते. परंतु या दिलेल्या निवेदनाचा काहीच परिणाम झाला नसल्याने आज मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.यावेळी उपजिल्हा अध्यक्ष नीलकंठ वखरे, मनसे तालुका अध्यक्ष जयदीप गोल्हार,, सतीश पटाईत, , विठ्ठल पट्टे, अशोक बेडके,अनिल सगळे विकी चव्हाण संतोष सावंत नामदेव खांडगाळे भाऊसाहेब बेद्रे शुभम मेहत्रे विकास वानखेडे शुभम सगळे जगन राऊत, गोपाळ सागडे, दिनेश मनेरी, निखिल डोंगरे, , बाप्पा मुगटराव , मोहन तौर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.