गेवराई (प्रतिनीधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत येथील र. भ. अट्टल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना ‘डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी’ या विषयाचे मोफत प्रशिक्षण युनिसेफच्या सहकार्याने देण्यात आले. राज्यात सुमारे १ लाख ११ हजार १११ हून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल प्रॉडक्टिव्हिटीचे प्रशिक्षण देऊन विश्वविक्रम करण्यात आला आहे. त्यात महाविद्यालयातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेतले. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. रजनी शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी अधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा म्हणून करिअर कट्टा समन्वयक डॉ. हनमंत हेळंबे यांना डॉ. अमोल शिरसाठ, डॉ.राहुल माने, डॉ.प्रदिप दहिंडे, डॉ. दिपक डोंगरे, प्रा. विनोद यादव, प्रा. जानवळे, प्रा. शिंदे, प्रा. उदय खरात आणि करियर संसदेचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
Home Uncategorized र. भ. अट्टल महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी विषयावर प्रशिक्षण