माणुसकी समुहाच्या सातव्या वर्धापनदिना निमित्ताने राज्यस्तरीय “सेवा गौरव” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

0
184

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर-सालाबाद प्रमाणे याही वर्षी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या व माणुसकी समुहाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील तळागाळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दात्यांचा सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा- गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात विषेश पुरस्कारासाठी ११ व्यक्तींना व सामाजिक कार्य, आरोग्य सेवक,महाराष्ट्र पोलीस,आदर्श शिक्षक, क्रीडा,युवा उद्योजक,कृषी भुषण,कवी,भारुडरत्न तथा शाहिर,तथा सामाजिक संस्था,अशा ३१ व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे.तेंव्हा सेवा गौरव पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक, संस्थेच्या कमीटी मंडळाने केले आहे.सेवा गौरव पुरस्कारांमध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह , एक पुस्तक आणि शाल श्रीफळ,एक वृक्ष देऊन गौरविले जाणार आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एका दिमाखदार सोहळ्यात शासकीय,अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सेवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.तरी महाराष्ट्र राज्यातील आदर्श व्यक्तीमत्वांनी आपले विहीत नमुन्यातील प्रस्ताव तयार करुन दि.१५ डिसेंबर २०२३ पर्यंत खालील दिलेल्या पत्यावर पाठवावे. प्रस्ताव पाठविल्या नंतरच निवड समिती आपली निवड जाहीर करतील.पत्ता:- समाजसेवक सुमित पंडित संस्थापक अध्यक्ष, सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्ण सेवा समुह शासकीय वैद्यकीय रुग्णलय घाटी संभाजीनगर, प्लाॅट क्र. ६०, हरी ओम नगर जटवाडा रोड हर्सुल परिसर ता.जि. संभाजीनगर पिनकोड 431001.मो. 07588928822 प्रस्ताव नमुना(१) संपूर्ण नाव:-
(२) जन्म दिनांक:-(३) लिंग. :-(४) संपूर्ण पत्ता.:-
(५) मोबाईल क्र.:-
(६) कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव:-(७)कोणत्या पदावर कार्यरत आहे :-(८)कार्यरत असल्यास पदावरील अनुभव:-
(९)यापूर्वी मिळालेला विशेष पुरस्कार :-(१०) आपले उल्लेखनीय कार्य लेखी स्वरुपात :-(वरील नमुन्यात आपली संपूर्ण माहिती पासपोर्ट फोटो सह दिनांक १५ डिसेंबर पूर्वी आमच्या कार्यालयात अथवा उपरोक्त व्हॉटसअप क्रमांकावर पाठवावे. 07588928822)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here