आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने व संस्थाध्यक्ष किशोर हंबर्डे व सचीव अतुल मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स दिनानिमित्त एड्स विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .रॅली करिता उपस्थित विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना एड्स संबंधी प्रा. मडके सी.डी.यांनी प्रतिज्ञा दिली व माहिती सांगितली. रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे उपप्राचार्य बाबासाहेब मुटकुळे उपप्राचार्य अविनाश कंदले यांनी ग्रीन सिग्नल देऊन रॅली सुरू झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व प्राध्यापक यांनी आष्टी परिसरात प्रभात फेरी काढली विविध घोषणांच्या गजरात एड्स विषयक जनजागृती केली. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीमध्ये आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र वैरागे , डॉ.सुहास गोपने, प्रा. देशमुख आनंद प्रा.चंद्रकांत मडके आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. टेकाडे श्री सरवदे समुपदेशक ग्रामीण रुग्णालय आष्टी ,दैनिक लोकमतचे प्रतिनिधी श्री अविनाश कदम यांच्या यशस्वी मार्गदर्शन व नियोजनाने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला