बीड जिल्ह्यातील निरपराध मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन चाललेली अटकसत्र थांबवा- बाबुराव पोटभरे

0
55

बेकसुर तरुणांना त्रास न देता जळीत कांडातील मास्टरमाइंड पोलिसांनी शोधावा.

बाबुराव पोटभरे यांची मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्याकडे मागणी.

बीड़ प्रतिनिधी दि.28

गरजवंत मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरला आहे. परंतु याला गालबोट लावण्याचे षडयंत्र कोणीतरी करत आहे.बीड जिल्ह्यात घडलेल्या जळीत प्रकरणातील मास्टरमाइंड पोलिसांना सापडत नाही.परंतु बेकसूर मराठा तरुणांना त्रास दिल्या जात आहे.पोलिसांनी या घटनेतील मास्टरमाइन शोधावा. अटक सत्र थांबवावे,व निरापराध तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागनी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्याकडे केली आहे.

बीड जिल्ह्यात आरक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या गरीब मराठा निरपराध पोरांच्या मागे पोलीस हात धुवून लागली आहे. पोलिसांना यातील आंदोलनाला बदनाम करणारा,षडयंत्र रचणारा मुख्य आरोपी सापडत नाही.परंतु पोलिसांनी जिल्ह्यातील निरपराध मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे गावागावातील सुशिक्षित, हातावर पोट असणारा तरुण भयभीत झाला आहे.यामुळे अनेक निरपराध तरुणांनी घरदार सोडली आहेत.संपूर्ण कुटुंबात पोलिसांच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हा पोलीसांचा अन्याय आहे.या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही.या बेकसूर आंदोलन कर्त्यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.यात कोणीही राजकारण करू नये.सर्व पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी,सर्व सामाजाच्या कार्यकर्त्यांनी बेकसुर आंदोलनकांच्या बाजूने उभे राहणे आवश्यक आहे.पोलिसांच्या चुकीच्या दडपशाहीला रोखणे आवश्यक आहे.हक्कासाठी लढणाऱ्या निरपराध आंदोलन कर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाहीत. प्रसंगी त्यांच्यासाठी रस्त्यावरही आम्ही संघर्ष करुत अशी मागणी बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here