आष्टी प्रतिनिधी
आष्टी शहरातील शेतीनिष्ठ शेतकरी,कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित,कोंडीबा रेडेकर यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.तवलवाडी रोड लगत महादेव मंदिराजवळ त्यांच्यावर दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार सुरेश धस,श्रीधरपंत सहस्रबुद्धे,संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सतीश आबा शिंदे,दिलीप हंबर्डे,दिनकर महाराज तांदळे,अनेक हरिभक्त परायण महाराज यांनी सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी हंबर्डे महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डी.वाय.चाळक,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे,प्रा.शंकरराव काकडे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,अनेक मान्यवर,विविध क्षेत्रातील ख्यातकीर्त महानुभाव उपस्थित होते.कोंडीबा रेडेकर यांच्या अंतदर्शनासाठी जनसागर लोटला होता.ते 78 वर्षाचे होते. त्यांच्या मागे ज्योतिबा,कैलास,तानाजी, संभाजी,शहाजी ही मुले.तथा तीन मुली, सुना,नातवंडे,पत्नी असा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे हे सर्व एकत्र कुटुंब आहे. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.