गेवराई येथे पाडवा संगीत महोत्सवाचे आयोजन

0
155

गेवराई (प्रतिनिधी ) -बलिप्रतिपदा पाडवा निमित्त स्वरकल्या सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित पाडवा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक मंगळवार १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री संत सेना महाराज मंदिर ,बाजार तळ गेवराई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शिवाजी महाराज नारायणगडकर, डॉ. नामदेव शास्त्री सानप, गुरुवर्य दिलीपबाबा घोगे, पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी, डॉ. अर्जुन महाराज जाधव यांचा शुभाशिर्वाद आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सर्व मराठवाड्यातील संत – महंत मंडळी व गुणीजन मंडळी यांची विशेष उपस्थिती आहे . सदरील कार्यक्रमाचे प्रायोजक उत्तम सोलाने, अरुण मस्के, अशोक काळे, विठ्ठल शिंदे ,श्रीहरी पवार ,अमोल माळवे, संजय भालशंकर, रामेश्वर वादे ,साईनाथ सुरवसे, राम उदावंत, गणेश धुमाळ , परमेश्वर महाराज वाघमोडे ,अक्रूर महाराज साखरे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. यावर्षी सायंकाळी ५ ते ६ यावेळेमध्ये विद्यार्थी वर्गांचे गायन व सायंकाळी साडेसहा वाजता सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते आणि सत्कार समारंभ होईल . तसेच ठीक सायंकाळी ७ ते १० यावेळेत प्रसिद्ध गायिका सौ गायत्री गायकवाड गुल्हाने व तुळशीराम आतकरे गुरुजी यांची भजन संध्या, भावगीत गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तबला साथ पवनकुमार उधे, पखवाज साथ विठ्ठल महागोविंद ,कीबोर्ड साथ कृष्णा व्यवहारे, राम धोंडरे ,हार्मोनियम साथ उत्तमनाना मोटे, ज्ञानेश्वर मोटे यांची लाभणार आहे .या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here