गेवराई (प्रतिनिधी)
गेवराई तालुक्यातील गढी येथील महाविद्यायात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला अज्ञात वाहनाने धडक दिली अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली होती उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथिल रुग्णालयात नेण्यात आले उपचारा दरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे
या घटने संबंधित अधिक माहिती अशी की
गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथील रुतुजा बाबुराव चौधरी, वय वर्ष 20, गढी येथील महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती दि.8 रोजी गढी येथील बीड, जालना रोडवर अज्ञात वाहनाने तरुणीला जोराची धडक दिली अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ,सदर तरुणीला प्राथमिक उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान निधन झाले आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे