रोहीतळ ग्रामपंचायतीवर सलग दुसर्यांदा विजयी षटकार
गेवराई दि. 8 : वार्ताहर : गेवराई तालुक्यातील रोहीतळ ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेचे युवा नेते मुकुंद बाबर यांच्यावर सलग दुसर्यांदा विश्वास टाकला असून, सरपंच पदाच्या उमेदवार सौ. समृद्धी मुकुंद बाबर यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताने विजय मिळाला आहे. या विजयाबद्दल माजी मंत्री बदामराव पंडित, अनिल दादा जगताप यांनी बाबर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवार ता. 6 रोजी जाहीर झाला. निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करून, विजयोत्सव साजरा केला आहे. तालुक्यातील रोहीतळ ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. या ठिकाणी चार पॅनल निवडणुक रिंगणात उभे होते. ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कारभार मुकुंद बाबर यांनी सांभाळला होता. गाव विकासाची महत्त्वाची कामे करून, राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी युवा सरपंच मुकुंद बाबर यांनी सतत प्रयत्न केले. त्यामुळे, मतदारांनी पून्हा एकदा बाबर यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. समृद्धी मुकुंद बाबर निवडून आल्या आहेत. त्या उच्च शिक्षित आहेत. बाबर यांनी गावगाडा सांभाळून, सर्व समावेशक भूमिका पार पाडली. गाव विकास वाटेवर आणण्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. शिवसेना नेते, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली, पूज्य.
नगदनारायण ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून, रोहीतळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासह सर्व उमेदवार निवडून आले आहेत. माझ्या सारख्या तरूण कार्यकर्त्यावर
गावाने पून्हा विश्वास टाकला आहे. ही, माझ्या साठी गौरवास्पद बाब असून, गावाचे मूलभूत प्रश्न सोडवून, भविष्यात या प्रश्नासाठी पून्हा फार काही गरज पडणार नाही. अशा काही गोष्टी मजबूतीने करून घेणार आहे. त्यासाठी आणखी जोमाने करायला बळ दिल्याबद्दल, सरपंच सौ. समृद्धी मुकुंद बाबर, युवा नेते मुकुंद बाबर यांनी
मायबाप मतदरांचे आभार मानले आहेत.