महाराष्ट्र राज्य. ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचायत समिती लोहा येथे एक दिवशी उपोषण कर्मचारी बांधवांच्या सहाय्याने पुर्णत्वास
नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे एन.जी. पी. 45 11 संघटनेतर्फे पंचायत समिती लोहा येथे अमरण उपोषण प्रस्थापित करण्यात आले . त्या साठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व नांदेड जिल्हाध्यक्ष काजी, अल्लाउद्दीन अर्धापुरकर, लोहा तालुकाध्यक्ष अध्यक्ष श्री रामेश्वर माणिकराव कोरडे, लोहा तालुका उपाध्यक्ष श्री दशरथ आप्पाराव वरपडे, श्री गोपीनाथ भोजू गायकवाड लोहा तालुका सचिव, अमरण उपोषण च्या विषयावर भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा 8.33 प्रमाणे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी 35 महिन्यांपासून न भरबाबत वरील विषयावर निवेदन व युनियन कडून विनंती करण्यांत येते की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अभियानांतर्गत प्रमाने भविष्यातील निधीची 50 टक्के रक्कमही ग्रामपंचायत निधीतून भरण्यात यावेत असे शासनाचे आदेश आहेत. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून उपोषण केले. ही बाब लक्षांत येतांच ग्रामपंचायत कर्मचारीही आपल्या कुटुंबांतील सदस्य आहेत, असे समजूनच ताबडतोब येऊन मागण्या मान्य करून कर्तव्यदक्ष अधिकारी पंचायत समिती लोहा गट विकास अधिकारी वर्ग १ आडे राघोबा सर, ओ एस वाघमारे साहेब सर्व कर्मचाऱ्यावर वैयक्तिक लक्ष ठेवणारे ग्रामसेवक राठोड साहेब, ग्रामसेवक शिंदे साहेब, तालुका व्यवस्थापक गुरझडे सर, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने उपोषण स्थळीं येऊन तात्काळ भेट देऊन मागण्या मान्य करून उपोषण मागे घेण्यास प्रवृत्त केले. आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या व तालुकाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष तसेच सर्व मान्यवरांचे अभिनंदन करण्यांत आले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या लोहा तालुका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी बांधव शुभेच्छा व आभार व्यक्त केले.