गेवराई प्रतिनिधी
गेवराई दिपवाली उत्सवानिमित्त ग्राहकाकडून हॉटेलमधील खाद्यपदार्थाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे भेसळ होण्याची शक्यता असते तरी याबाबत भेसळयुक्त निष्कृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री होणार नाहीत याबाबत प्रशासनाने जागृत राहून कारवाई होणे अपेक्षित आहे जेणेकरून आरोग्यास अपाय होणार नाही अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत चे प्रमुख अनिल बोर्डे यांनी माननीय जिल्हाधिकारी बीड तहसीलदार गेवराई मुख्याधिकारी नगरपरिषद गेवराई व उपकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वितरण उपविभाग गेवराई यांच्याकडे मागणी केलेली आहे.
तसेच शहरातील व ग्रामीण भागातील दिवाळीच्या कालावधी मध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित केला जातो तरी दिनांक ९/११/२३ ते १५/११/२३ पर्यंत राज्य वितरण मंडळाकडून नियमितपणे वीज पुरवठा करण्याच्या सूचना तात्काळ देणे आवश्यक आहे जेणेकरून दिवाळीच्या कालावधीत वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी मागणी वितरण विभागाकडे करण्यात आली आहे.
तसेच गेवराई शहरात दिवाळीनिमित्त माळी गल्ली ते कोल्हेर रोड मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन ग्राहकांना महिला ग्राहकांना ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावर चालणे कठीण होते तरी याप्रकरणी प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राहील याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे पत्रात नमूद केले आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मागील वर्षाची अतिवृष्टी व पिक विमा रक्कम तसेच यावर्षीचे पीक विमा अग्रीम 25% दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याबाबत तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे याबाबत शासन नियमाची अंमलबजावणी करावी असे पत्रात नमूद केलेले आहे तरी या निवेदनावर काय कारवाई करून सहकार्य करावे अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र बीड चे उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक पंचायत चे मार्गदर्शन प्रमुख अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्राध्यापक बीबी फलके नारायण अवधूत इंजिनीयर राजेंद्र सुतार विश्वास चपळगावकर गणेश रामदासी वल्लभ तौर गायकवाड आदीं नायब तहसीलदार संजय जी सोनवणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे