गेवराई ( प्रतिनिधी )चकलांबा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामाच्या मुद्द्यावरच श्री.रोकडेश्वर ग्राम विकास पॅनल विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व विकासासाठी सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.प्रियंका ताई खेडकर यांच्या समवेत वार्ड क्रमांक एक मधून सौ.जया कुंडलिक गुंजाळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत.
एकच ध्यास वार्डाचा विकास करण्यासाठी सदैव जनतेत कार्यरत राहणार नागरिकांच्या समस्या कायमच्या दूर करण्याचे काम करत राहणार आणि वार्ड क्रमांक एक च्या उज्वल भविष्यासाठी वार्डातील रोड, रस्ते, नाल्या, पाणी प्रश्न, लाईट प्रश्न, लहान मुलांसाठी अंगणवाडी, शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबवणार , क्रीडांगण, यासारख्या विविध विकास कामे करण्यासाठी श्री रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदाच्या सौ. प्रियंका ताई खेडकर व जया कुंडलिक गुंजाळ यांनी केलेल्या विकास कामाचा संकल्प जनतेच्या हितासाठी करुं असे आश्वासन यांनी सांगितले. येणाऱ्या काळात मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या सोबत राहील असे प्रतिपादन सौ.जया कुंडलिक गुंजाळ यांनी केले आहे.