गृहिणी म्हणजेच गृहीत धरता येण्याजोगी
पण खरा वास्तविक अर्थ आहे तो म्हणजे गृहस्वामीनी.
सौ. कविता भानुदास रनधिर
तर आज मला एक फोन आला होता , मॅडम आपणचं सौ. उज्वला गुरसुडकर आहेत का..??
आवाज अनोळखी होता, ऐकून मला थोडा कोण असेल ही व्यक्ती असा प्रश्न पडला होता, आपण कोण म्हणण्याची गरज वाटत होती, त्या अगोदरच समोरून
धाडधाड स्वतः ची ओळख देण्यास सुरुवात झाली. आणि कासावीस झालेल्या आवाजात ती बोलली ताई महिलांच्याच वाट्याला का हो येवढा संघर्ष….?? तो प्रश्न ऐकून मीही थोडीशी थक्क झाले. परत तिने विचारले स्वाभिमान, सेल्फरिस्पेक्ट स्त्रियांना स्वतः च असं आस्तित्व असं काहीच नसतं का हो , माझ्या मनात गोंधळ उडाला होता. मला सुद्धा नवीन नव्हते हे, कारण मी स्वतः एक महिला असल्यामुळे तिच्या भावना ओळखीच्या वाटल्या.
एक स्त्री च्या भावना समजून घेणे तिचा मानसन्मान सांभाळून तीला तिच्या परीवारासाठी घराबाहेर जाऊन कामं करायची असतात.
हे सगळं ऐकून वाटले ह्या गोष्टी व्यक्त करण्याची खरंच खूप गरज आहे.
तिला जे वाटते ते समाजासमोर आणण्याची गरज आहे…
ती सांगत होती मी गुजरात राज्यात सुरत येथील रहिवासी सौ. कविता भानुदास रनधिर बोलत आहे. तुम्ही अनेक स्त्रियांच्या जीवनावर आधारित सत्य परिस्थिती वर प्रकाश टाकण्याचे कार्य करतात, तुमचे अनेक लेख माझ्या वाचनात आले आहेत. एक स्त्री म्हणून तुमच्या कार्याबद्दल खूप कौतुक वाटले. आणि संघर्षमय जीवनातून ज्या स्त्रिया उंच गगनभरारी घेउन शिखरावर पोहोचलेल्या त्या महिला भगिनींचे ही खुप कौतुक वाटले.
मग मला ही असं वाटतं होतं तुमच्याशी बोलायला पाहिजे माझ्या जीवनातील व्यथा, व्यथित, तुम्हाला सांगायला पाहिजे, पण हिंमतच होत नव्हती. मोबाईल मध्ये नंबर सेव्ह करून ठेवलेली होती बरेच वेळा नंबर डायल करायचा प्रयत्न केला आणि का कुणास ठाऊक असं वाटायचं ह्या बोलतील का माझ्याशी अनेक प्रश्न पडायचे व परत मी विचार बदलतं असे. पण आज बोलण्याची तीव्र ईच्छा स्वस्त बसेनासी झाली , शेवटी मी आज तुम्हाला काॅल केले. तुम्हाला वेळ आहे ना ताईसाहेब असं विचारल्यावर मी होकार देताच ती स्वतः बद्दल सांगायला सुरुवात केली.
तिच्या संघर्षमय जीवनाची कोणीतरी दखल घेण्यास तयार आहे. हे समजताच ती पहिल्यांदा मनमुक्त रडुण मोकळी झाली. आणि मग सुरूवात….
जन्मजात वाट्याला आलेल्या संघर्षमय परिस्थितीत चे अवलोकन करण्यास सुरुवात केली जन्म धुळे जिल्ह्यातच झालेला. नथुराम धोंडु मोरे ची द्वितीय कन्या, तीन बहिणी एक भाऊ आईवडील असा परिवार वडिलांची परिस्थिती जेमतेम भाऊ, वडिल मिलमध्ये कामं करून घर चालवण्यासाठी सर्वांचीच धडपड असायची. परिस्थिती मुळे आईवडिलांनी लवकरच लग्नाचा निर्णय घेतला आणि गृहस्थ जीवनात प्रवेश झाला.
स्त्री जन्माच्या कहाणीची सुरूवात. पतीकडील आर्थिक बाजू तशी जेमतेमच. महिलांच्या जिवनाच्या कष्टांचे मोल करावेत तेवढे कमीच.
पांच वर्षांनी मुलगा झाला पण पतीच्या पगारात कुटुंबाचा खर्च भागत नव्ह्ता म्हणून घरकाम एक मूल सांभाळून मोलकरीण चे काम करण्यात लाज बाळगली नाही व्यक्तित्व बघुन कोणी कामाला बोलाविण्याचे पण टाळायचे.
लोकांचें धुणे भांडी, केरकचरा, टिफीन बनवून देणे अशी अनेक कामे करून संसार चालू होता. पतीच्या आजारपणामुळे कळजाच्या तुकड्यांची आभाळ होतं असल्याने तीन वर्षांच्या लहान जीवाला वस्तीगृहात ठेवले. लागेल ती मेहनत करून पैसे जमवून पतीच्या तीन वेळा शस्त्रक्रिया केल्या. ह्या सगळ्या घडामोडींमुळे लहान मुलांचं बालपण अनुभवता आलें नाहीं ही खंत आयुष्यभर त्या आईला राहुनच गेलीं.
आज टिफीन चे काम साडी व्यवसाय करत बरेच दिवस गेले . सुरतमध्ये स्वतः च घरं घेऊन स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अट्टाहास होता तो पुर्ण केला. राजकारणातही मानाचं स्थान आहे. भाजपचे सुरतमधील पदभार सांभाळून पतीच्या तब्येतीची काळजी घरकाम राजकारण मुलांचे शिक्षण इतर समाज कार्य सक्षम पद्धतीने पार पाडणारी गृहिणी तिच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा…..
एक गृहिणी समाज तीला सहज म्हणतो आणि आपण ही बघतोय घराघरांत स्त्रिया सहजपणे बोलल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे तुला काय कळतेय घरकामाच्या पलीकडे जाऊन तु काय करतेस ह्या प्रश्नांची उत्तरे देणारी महिला भगिनी जगाच्या पाठीवर प्रत्येक घरात पाहायला मिळते आज गृहिणी दिनानिमित्त हा लेख लिहावासा वाटला. कारण कविता सारख्या अनेक गृहिणी संघर्ष करत आहेत त्या सर्वांना आज गृहिणी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा……
*संकलन*
सौ. उज्वला गुरसुडकर
9764887662