नवरात्री उत्सव निमित्त वैजापूर सायकलिस्टचा कोटमगांव येथे सत्कार

0
180

वैजापूर प्रतिनिधी

जलतरण व सायकलिंग ग्रुप वैजापूर यांनी रॉयल रॉयडर क्लब नाशिक आयोजित दि.११-१०-२०२३ ते २१-१०-२०२३ या कालावधीत २५० किमी सायकल राईड चॅलेंज मधे ५२ सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला आहे. डॉ. आबा पाटील अध्यक्ष , रॉयल रॉयडर क्लब नाशिक यांचे हस्ते सर्वश्री. बाबासाहेब जगताप, प्रशांत गायकवाड , भास्कर खरात , नानासाहेब साळुंके, चरणसिंग काकरवाल , अंकुश वाघमारे, भिमाशंकर तांबे, योगेश गवळी , योगेश गाढे, नवनाथ निकम , शौर्य खाडे, हर्ष गायकवाड , गंगाराम घुमरे, काशिनाथ गावित, नामदेव चोरे, बाबासाहेब वारकर , मोहन थोरात, विठ्ठल सावळे , जयराम खाडे , कु. वेदिका गाढे, व शौर्य गाढे यांचा नवरात्री राईड पुर्ण केल्याबद्दल मेडल देवून सत्कार करण्यात आला आहे. तसेच लकी ड्रॉ मधे प्रा.ज्ञानेश्वर जाधव , प्रशांत गायकवाड . भास्कर खरात , हर्ष गायकवाड , शौर्य खाडे, नानासाहेब साळुंके जणांना पैठणी साडी , चांदीचे जोडवे , सोन्याची नथ अशी बक्षिसे मिळाली आहे . याप्रंसगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. सानप मॅडम होत्या तर सुत्र संचालन डॉ. आबा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संदिप दराडे यांनी केले. याप्रसंगी नाशिक , वैजापूर ,सिन्नर, निफाड, सटाणा , मालेगांव , चांदोरी , येवला येथील सायकलिस्ट उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here