गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे असणाऱ्या असुविधा तात्काळ सुधारा : मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे

0
204

गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे असणाऱ्या असुविधा तात्काळ सुधारून लोकांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. सर्व स्टाफ, डॉक्टर यांनी रुग्णांना खाजगी रूग्णालयाची वाट न दाखवता रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सर्व सुविधा देण्यासाठी सांगावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.
गेवराई शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे सोलापूर – धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्त्वाचे रुग्णालय असून या राष्ट्रीय महामार्गावर हामखास छोटे मोठे अपघात होत असतात. या अपघात जखमी झालेल्या रुग्णांना गेवराई उपजिल्हा रुग्णालय अनले जाते. या रुग्णांलय सर्व सुविधा उपलब्ध असून येथील डाॅक्टर अपघात झालेल्या रुग्णांना मलम पट्टी करुन चक्क खाजगी रूग्णालयाची वाट दाखवतात नाहीत तर बीड येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात पाठवतात. असे का याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देवुन सर्व पहाणी केली. तेंव्हा तेथे प्रचंड असुविधा असल्याचे दिसून आले. यामध्ये जाणीव पुर्वक एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन, ई.सी.जी.मशिन, बंद ठेवुन खाजगी दवाखाने, खाजगी मेडीकल, डोळ्याचे दवाखाने यांच्याकडून कमिशन मिळवण्यासाठी सर्वच डॉक्टर, स्टाफ, वैद्यकिय अधिक्षक यांनी उपजिल्हा रुग्णालय नावापुरतेच ठेवले असल्याचे निदर्शनास येते. रुग्णांना होणारे हाल तात्काळ थांबवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई हे राष्ट्रीय महामार्गावर असल्याने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले ट्रामा केअर युनिट अर्थोपेडीक डॉक्टर अभावी तसेच तेथील मशिन बाजुला ठेवल्याचे ते बंद आहे. ते तात्काळ चांगल्यापैकी सुरु करावे. डिलेवरीच्या पेशंटची संख्या जास्त असुन देखील सोनोग्राफी एका छोटया पार्टमुळे बंद आहे. तसेच रक्त नमुने घेण्यात येत नसल्याने लोकांना बाहेरून नगदी पैसे खर्चुन काढावी लागतात. तसेच डॉक्टर संख्या वाढवण्यात यावी. ते सर्व नसल्याने पैसे खर्चुन डिलेवरी करण्याची वेळ पेशंटवर येत आहे. वरील सर्व मशिन तात्काळ सुरु करण्यात याव्यात, एक्स-रे मशिन तात्काळ सुरु करण्यात यावी, सध्या औषधीचा प्रचंड तुटवडा आहे तो तात्काळ भरून काढण्यात यावा, तसेच तेथे कत्रांटी कर्मचारी असल्याने स्टॉक मेंटेन होत. तेथे पुर्णवेळ कर्मचारी भरण्यात यावेत, उपजिल्हा रुग्णालयात डोळ्यांचे फक्त आठवड्यात एकच वेळेस १२ ऑपरेशन करण्यात येतात ते वाढवावे, रुग्णालयाची साफ सफाई दिली आहे ते साफ सफाई व्यवस्थित करत नाही. तसेच बेडशिट रंगानुसार, वारानुसार टाकण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांचा करार रद्द करण्यात यावा. रुग्णांना निकृष्ट जेवन देण्यात येत आहे त्याचा दर्जा सुधारावा बोर्डवर ठळक अक्षरात मेनु लिहीण्यात यावा, बाह्यरुग्ण विभागाची रोजची ओपीडी ८०० ते ९०० रुग्णांची असतांना एक किंवा दोन डॉक्टर उपस्थित असतात. त्यांना ते कशेच हँडेल होऊ शकत नाही.तेंव्हा सर्व डॉक्टरांना बसण्यास सांगावे. जेणेकरुन रूग्णांची हेळसांड होणार नाही. वैद्यकिय अधिक्षक यांना देखील बसण्यास सांगावे. आणि नसेल बसायचे तर यांना कमी करण्यात यावे. या सर्व सुविधा रुग्णांना दिलासा रुग्णांची हेळसांड थांबेल लोकांचे खाजगी दवाखाण्यात जाणारे पैसे वाचतील. यामध्ये लवकरात लवकर बदल न झाल्यास मनसेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here