एनजीओ बी.टी.ई. फाऊंडेशन व माई वृद्धाश्रमाचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
“एक हात मदतीचा”
नको असलेले जुने कपडे द्या.. हवे असलेले घेऊन जा
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
जुन्या कपडय़ांचे दान, गरिबांसाठी वरदान’ हे ब्रीद घेऊन एनजीओ बी.टी.ई. फाऊंडेशन व माई वृद्धाश्रम खास सामाजिक कामाच्या माध्यमातून गरिबांचा दुवा घेण्याचे काम करीत आहे.आपल्याला नको असलेले जुने कपडे हे दान म्हणून स्वीकारून ते वंचित दुर्बल घटकातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘NGO bodhi tree educational foundation व माई वृद्धाश्रमांतर्गत सुरू आहे. ‘जुन्या कपडय़ांचे दान, गरिबांसाठी वरदान’ हे ब्रीद घेऊन माई वृध्दाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे, रामदास वाघमारे हे शिक्षक दांपत्याच्या सामाजिक कामाच्या माध्यमातून गरिबांचा दुवा घेण्याचे काम करीत आहे. हे काम जलदगतीने होण्यासाठी आपल्या सारख्या समाज सेवक,दानशूर दानदात्यांच्या माध्यमातून NGO कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून अनाथ निराधार मुला मुलींना जुने नवीन कपडे वाटप करण्यात येणार आहेत. आपण जमा केलेले जुने कपडे, शैक्षणिक साहित्य घेऊन ते गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम बी.टी.ई. फाऊंडेशन व माई वृध्दाश्रमाच्या माध्यमातून करीत आहोत. ‘तुम्हाला नको ते आम्हाला द्या, आम्ही ते गरजूंपर्यंत पोचवू’ या तत्त्वावर सेवाभावी वृत्तीने हे काम करत आहोत. ताई दादा आपल्या माध्यमातून ‘सामान्य जनांना आनंद मिळू दे, उत्तम वस्त्रे परिधान करू दे! तुमची नको असलेली वस्त्रे त्यांच्यासाठी शान ठरू दे!’.
आयोजक :- माई वृध्दाश्रम संचालिका मीरा वाघमारे,संपर्कासाठी मोबाईल नंबर8888125610/8421141104/7038093430
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231022-WA0055-2-1024x622.jpg)