!!! या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपे संस्थीतां ! नमस्तस्यें नमस्तस्यें नमस्तस्यें नमो नमः !!!
सौ. कुंदा ताई नानाभाऊ सोनवणे
मुलगी अशी असते,ती दोन घराची भक्कम रक्षक असते.
आभाळाची काया आणि आईवडिलांची अपार माया
कुटुंबाच्या खऱ्या वंशाची ज्योत आनंद,चैतन्य मुलगी च असते.
जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जग उद्धरी.
आता तर 33 टक्के आरक्षणाचा आधार असल्या मुळे तिच्या हातात,देशाच्या भवितव्याची कांस आहेचं.
कुटुंबात संस्कृती संस्कार रूपी लक्ष्मण रेषा जोपासत सर्वांची मने जिंकणारी एक दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, या सर्व रूपाने दर्शन करून देणारी मुलगीच असते.
काय तिची वर्णावी गाथा, गुण गाईन तेवढीच तिची महानता.!!
आज आपण जाणून घेऊ, अशीच साधीसुधी सुसंस्कृत आध्यात्मिक व फक्त घरं , मुलं आणि परीवार तेवढंच तीचं विष्व असनारी “नारी शक्ती” घराबाहेर पडुन अनेक घरं बनवणारी 5000 पेक्षा जास्त विवाह जुळवून मोफत विवाह मेळावा आयोजित करणे अनेक क्षेत्रांत समाजीक कार्य, करून समाजरत्न पुरस्कार मिळविणारी धाडसी गृहिणी सौ. कुंदा ताई सोनवणे बद्दल.
सौ.कुंदाताई नानाभाऊ सोनवणे, श्री रामदास नारायण पवार यांची तृतीय कन्या कुंदा ताई पवार सात बहिणी आई वडील असा परिवार. वडिल पोलिस खात्यात होते, पण त्यांना कधीच वाटले नाही की मला सात मुली आहेत कधीही उंच मान करून सांगायचे की खूप भाग्यवान आहे मी की मला सात मुलीचे कन्यादान करण्याचे भाग्य मिळते. पण त्यावेळी अशी परिस्थिती होती की एवढ्या मुली समाज त्यावेळीही हिन भावना ठेवायचे.आणि नातेवाईक सुध्दा कमी लेखायचे. ताईंच्या बालबुद्धी ला नपटणारी गोष्ट, राग येऊनही उपयोग नव्हता. ते बालमन आईला सतत विचारायचं समाज मुलींना का कमी लेखतो.
मग आई सांगायची की लेक ही परक्यांचं धण,वंशाचा दिवा नाही, तुम्ही सगळ्या दुसऱ्यांच्या घरी जाणार, खूप त्रास व्हायचा पण पर्याय नव्हता.
त्यावेळी दहावी पास झाले की लग्न करून देण्याची प्रथा, इतक्या बहिणी असल्याने तर आईला खूपच घाई, कधी मुलीचे लग्न होणार आणि आपण जबाबदारी मुक्त कधी होणार.
यामुळे दहावीत कुंदा ताई चे लग्न झाले. वय अवघें सोळा, सतरा त्यावेळेस कमी वयात एवढी जबाबदारी पेलण्यासाठी मुलीला सक्षम व्हावे लागायचे. मग लग्न शिंदखेडा तालुक्यात दरणे रोहाणे गावात श्री भिवसेन दोधु सोनवणे यांचा मुलगा श्री नानाभाऊ भिवसेन सोनवणे यांच्याशी विवाह 9/2/19 88 ला झाले. पती एस.आर.पी. पोस्टिंग धुळे जिल्ह्यात. आणि लगेच दोन वर्षांत अमरावती येथे बदली झाली त्यामुळे त्यांच्या सोबत जावे लागले. तेथुन जीवनाचा संघर्ष सुरू.
पती दोन तीन महिने बाहेरगावी ड्युटीवर, मोठा मुलगा फक्त पाच महिन्यांचा होता आणि अमरावती येथे कोणीच नातेवाईक सुध्दा जवळ नाही छोटं बाळ घेऊन, जबाबदारीने एकटीच दोन तीन महिने बाहेरगावी राहायचे.
आणि जीवनसंघर्षाची सुरूवात, मुलांना सांभाळून घरकाम सर्व जबाबदारी, मुलाचे शिक्षण ह्या सर्व गोष्टी म्हणजे तारेवरची कसरत.
मुलांना मोठं करत, आध्यात्मिक वृत्ती जोपासली.
ताईंनी मोठ्या धैर्याने हे सर्व करताना समाज सेवेचा वारसा हाती घेतला. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, पालकपरिचय मेळावा विवाह जुळविणे असे अनेक कार्य जनजागृती समाज प्रबोधन, वृक्षारोपण, मुकबधीर मुलांना अन्नधान्य दानं, संतती, कुंडली समस्या मार्गदर्शन, मोफत वधू वर मेळावा आयोजन असे अनेक समाजकार्य व जनजागृती बऱ्याच कार्याबद्दल समाज रत्न पुरस्काराने सन्मानित.
तरीही पुढील वाटचाल चालू आहे. सुसंस्कृत घरातील मुलगी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देते शिक्षण जास्त असोत किंवा कमी जर मनात जिद्द सेवाभावी संस्कार आणि आध्यात्मिक ज्ञानाचा भर असेल तर स्त्री शक्ती ला कधीही स्वत बसुदेत नाही .ती स्वतः ला सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही या आदिशक्ति ने दाखवून दिले आपल्याला परिस्थिती अनुकूल असोत किंवा प्रति कुल ती संघर्षात कधीचं माघार घेणार नाही हेच उदाहरण आपल्या कार्याद्वारे ताईंनी जगासमोर ठेवले आहे.
ताईंच्या कार्याला अशीच भरभराट येवोत हिचं सद्दीच्छा.
संकलन
सौ. उज्वला गुरसुडकर
9764887662
gursudkarujjwala@gmail.com
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/10/IMG-20231022-WA0055-1024x622.jpg)