महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या वतीने सत्कार
माजलगांव : अमर साळवे
मराठवाडा मुक्तीसंग्राम अम्रत मोहोत्सवी वर्ष व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी बीड जिल्ह्याचे माजी खासदार तथा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉम्रेट गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त
महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलीत गोदावरी विद्यालय मंजरथ तालुका माजलगाव आयोजित तालुका स्तरीय खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यालय माजलगांव येथे करण्यात आले होते. या स्पर्धे मध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महात्मा ज्योतीबा फुले माध्य. विद्यालयातील ७ वी वर्गातला विद्यार्थी प्रसेनजीत अमर साळवे याने ५ वी ते ७ वी गटातील स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्या बद्दल प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह व बक्षिस देऊन गौरविण्यात आले . प्रसेनजीत च्या कर्तत्वा बद्दल त्याचे महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी मुख्याध्यापक किशोर मोताळे सर , वर्ग शिक्षक माधव कर्णे सर पर्यवेक्षक मसलेकर सर , दायमा सर , गायकवाड सर , शेरकर सर , प्रविन काळे सर , गिरी सर , दायमा मॅडम , शेख सर सह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .