सुरळेगांव जि प. शाळेतील घटना खिचडीत अळ्या

0
421

गेवराई । प्रतिनिधी ।

सुरळेगांव ता.गेवराई जि.बीड येथील जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत अळ्या तरंगत असतानाही खिचडी बनवली गेली. वाटप करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पालकांनी वेळीच लक्ष घातल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. खिचडीमध्ये अळ्या पाहून मुलांना उलठ्या झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

सुरळेगांव ता. गेवराई या शाळेत जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. या प्रकाराबाबत शाळेचे मुख्याध्यापक मंजुळेसर यांना याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मुख्य बाब म्हणजे शाळेचा स्टाफ यांचेदेखील दुर्लक्ष होतांना दिसतेय.

खिचडी बनविणाऱ्या कदमबाई या मुख्याध्यापक यांच्या मर्जीतील आहेत. त्या नियमित खिचडी बनविण्यासाठी काम करतात. विध्यार्थ्यांना पौष्टीक आहारातून चांगला पोषण आहार मिळावा म्हणून राज्याचा शिक्षण विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत खेड्यापाड्यातून मुलं आणि मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकत आणि विषबाधा होऊन विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी अशा अळ्या खिचडी मध्ये अनेक वेळा सापडल्या आहेत. याबाबत मुख्यध्यापकांकडे पालक-विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. मात्र मुख्यध्यापक आणि शिक्षकांनी याबाबीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. गावातील सरपंचदेखील या घटनेकडे दुर्लक्ष करीत असून, मुख्याध्यापकांना नेहमीच पाठीशी घालत असल्याचे समजते. या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेला मुख्याध्यापक जबाबदार आहेत.

त्यांना संपर्क केला असता प्रथम त्यांनी फोन उचलला, नंतर फोन वाजला… पण उचलला नाही.
खिचडी मध्ये आळ्या व किडे वारंवार पडलेले दिसतात. यामुळे विध्यार्थाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुलं, मुलींची शाळेत हजेरी पटसंख्या कमी असते अशा घटनेमुळे शाळेत मुले नियमित यावीत, शाळेबद्दल त्यांच्या मनात गोडी लागावी म्हणून शाळेकडून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र याबाबत मुख्याध्यापक मंजुळे सरांशी फोन वरून चर्चा माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीच उलट प्रश्न केले. म्हणाले, तुम्हांला कुणी हे सांगितले, माहिती घेतो ,माहिती नसल्याचे दाखवून उडवाउडवीची उत्तरे दिली.
याबाबत अधिक माहिती व म्हणणे घेण्यासाठी मुख्याध्यापक मंजुळेसर यांना बुधवार, दिनांक 20 व 21 सप्टेंबर रोजी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी कॉल घेतला नाही. बराच वेळ रिंग वाजली मात्र कॉल उचलला गेला नाही..प्रशासनाने हया घटनेकडे गंभीर लक्ष देऊन दोषी वर निलंबन कार्यवाही करावी असे स्थानिक गावकरी आणि अनेक संघटना व राजकिय पक्ष निवेदना द्वारे तहसीलदार यांना भेटून निवेदन देणार आहेत असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here