पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर जि सोलापूर येथे भारतीय नरहरी सेनेच्या वतीने दि.२४/०९/२०२३ वार-रविवार या दिवशी हॉटेल “विठ्ठल इन” येथील फंक्शन हॉल या ठिकाणी सर्व शाखीय सोनार समाजाच्या विचार मंथन बैठकीचे आयोजन केले गेले होते.
या विचार मंथन बैठकीत सोनार समाज चळवळी सह ओबीसी,बाराबलुतेदार समाज चळवळीचे कार्यकर्ते तथा सर्व शाखीय सोनार समाज ऐक्यासाठी समाज मनांत स्थान प्राप्त केलेले सोनार समाजातील संघर्ष यात्री म्हणून सर्व परिचित असलेले समाजप्रिय श्री राजेश ( भाऊ ) पंडित,रेणापूरकर यांना भारतीय नरहरी सेनेच्या प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता पदाचे नियुक्ती पत्र माजी आमदार तथा शिवसेना उपनेते ( उबाठा ) गटाचे मा.श्री. रविंद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या शुभहस्ते देण्यांत आले या वेळी भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब बुराडे तसेच मा.सचिनशेठ कुल्थे,मा.रामानंदजी तपासे,मा.संदिपशेठ टाक,मा.अरुणरावजी मंजरथकर,श्री.मुकूंदजी वेदपाठक,श्री. मोहन भाऊ पोतदार श्री. विजयकुमार दिक्षित,मा.लंकेशजी बुराडे,युवा प्रदेशाध्यक्ष मा.राजेशजी टाक (गेवराई) तसेच श्री.केशवराव पंडित,सुवर्ण वार्ता या युटयुब चँनलचे संपादक मा.दिनेशजी येवले ,शेगांव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल (भाऊ) उंबरकर मा.श्री.रविशंकर धर्माधिकारी साहेब,मा.दिवाकर भटकळ साहेब ( मुंबई ) या मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यांत आले व पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस या निवडीमुळे राजेश पंडित यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनांचा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.