77 गावात पोहोचला जनसेवेचा यज्ञ ; 30 हजार रुग्णांवर झाले मोफत उपचार, 300 जणांची झाली मोतीबिंदू शस्त्रक्रिया
बीआरएसचे युवानेते बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडकर यांच्या उपक्रमाची तालुक्यात चर्चा
गेवराई : प्रतिनिधी
बीआरएस पक्षाचे युवानेते बाळासाहेब मस्के व गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक मयुरीताई खेडकर – मस्के या दाम्पत्यांनी गेवराई मतदारसंघातील गावागावात ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ हा उपक्रम सुरू करुन जनसेवेचा वसा हाती घेतला आहे. या उपक्रमाची तालुक्यात चर्चा होत असून मस्के दाम्पत्य करत असलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान हा जनसेवेचा यज्ञ आतापर्यंत तालुक्यातील 77 गावात जाऊन पोहचला आहे. मागील दीड महिण्यापासून सुरू असलेल्या या यज्ञात आतापर्यंत 30 हजारापेक्षा अधिक जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली असून यामधील 2 हजार 700 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवल्यानंतर यामधील 300 नेत्र रुग्णांवर पुणे येथील एच व्ही देसाई रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर टप्प्याटप्प्याने उर्वरित रुग्णांवर देखील मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी ट्रॅव्हल्स सुरू आहेत.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गेवराई मतदारसंघात भारत राष्ट्र समिती पक्षाचे युवानेते बाळासाहेब मस्के व मयुरीताई खेडकर – मस्के यांच्या संकल्पनेतून मोफत गाव तेथे आरोग्य शिबीर राबविले जात आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली जात आहे. तसेच बंद पडलेल्या श्रावणबाळ व संजय गांधी निराधार पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे, पी.एम. किसान सन्माननिधी नोंदणी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची संपूर्ण माहिती व योजनेचा लाभ मिळवून देणे, आयुष्यमान भारत कार्ड, ईश्राम कार्ड, हेल्थ कार्ड, या आरोग्य शिबिरादरम्यान नागरिकांना काढून दिले जात आहेत. मागील दीड महिण्यापासून सुरु असलेल्या या शिबिरात तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यासह 77 गावात हे शिबिर आतापर्यंत संपन्न झाले आहे. दरम्यान 29 हजार रुग्णांच्या नेत्र तपासणी व उपचारानंतर या गावातून 2 हजार 700 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे शिबिरातील तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार 300 पेक्षा अधिक रुग्णांना ट्रॅव्हल्सद्वारे पुण्याला पाठवून एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णांना तपासणी, जाणे-येणे, शस्त्रक्रिया खर्च व राहण्याची व्यवस्था ही बाळासाहेब मस्के, मयुरीताई मस्के यांच्या वतीने मोफत करण्यात येत असल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
चौकट –
जिवे मारण्याच्या धमकीनंतरही बाळासाहेब मस्केंची जनसेवा अखंड सुरुच
बाळासाहेब मस्के व मयुरीताई खेडकर यांनी गेवराई तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी गाव तेथे आरोग्य शिबीर राबविण्यास सुरुवात केली. या शिबिरात गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया होऊ लागल्याने गावोगावी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागल्या मुळे या शिबिराची जोरात चर्चा सुरू होऊन वर्षानुवर्षे सत्ता भोगलेल्या प्रस्थापितांना जनता या शिबिराचे कौतुक करुन नावे ठेवू लागली. यामुळे बाळासाहेब मस्के यांना मागील आठवड्यात शिबीर थांबव नसता जिवे मारण्याची एका निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली. तुम्ही दोघे नवरा-बायको तालुक्यात शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहात. त्यामुळे बीआरएस पक्षाचे काम थांबव, नसता गोळ्या घालून दाभोळकर करु अशी धमकी या पत्रात बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडकर यांना दिली असताना देखील या पत्राला भीक न घालता हे शिबीर अखंड सुरुच ठेवल्याने बाळासाहेब मस्के व मयुरीताई खेडकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.