गेवराई प्रतिनिधी
शेतात उभ्या असलेल्या गांजा पिकावर पोलिसांनी धडक कारवाई करून, 27 लाख रूपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. सदरील कारवाई बुधवार ता. 13 रोजी करण्यात आली असून, जिल्ह्यात
खळबळ उडाली आहे.
चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतात पिकवलेल्या गांजा पिक जप्त करून, तब्बल २७ लाख रुपयांचा ५५४ किलो ग्रांम गांजा जप्त केल्याची कारवाई सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांनी केली.
घोगसपारगाव ता. शिरुर येथे संभाजी कराड याने स्वत:चे मालकीचे शेतामध्ये गांज्याची लागवड केली आहे. अशी माहिती मिळताच घोगसपारगाव ता. शिरुर येथील गांजा लागवड करण्यात आलेल्या शेतामध्ये छापा मारला असता एकुण 554 कि. ग्रॅ. गांजा, ज्याची किंमत 27, 27,700 रूपयांचा
[ सत्ताविस लाख सत्ताविस हजार सातशे ] मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीस संभाजी हरीभाऊ कराड, वय – 37 वर्ष, रा. घोगसपारगाव यास ताब्यात घेण्यात आले असून सदरिल सयुक्त कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांनी केली आहे. कारवाईत उपअधिक्षक खाडे, सपोनि एकशिंदे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांचा सहभाग होता. पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीनुसार चकलंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.