कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रालयात घेतली भेट
गेवराई प्रतिनिधी
2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. एन.डी.आर. एफ. नुसार झालेले सर्वेक्षण व पंचनामे गृहीत धरून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देणे अपेक्षित असताना भारतीय कृषी विमा कंपनीने आडमुठी भूमिका घेतली. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली.याबाबत सर्व कायदेशीर पद्धतीने 28/11/2022 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता प्रधान सचिव कृषी यांच्या मंत्रालय मुंबई येथील दालनात राज्य तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली.आमदार लक्ष्मण पवार,आमदार नमिता मुंदडा, एकनाथ डवले प्रधान सचिव कृषी, सारिका बांदेकर सहसचिव कृषी, विनयकुमार आवटे मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्तालय पुणे, शकुंतला शेट्टी विभागीय व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी, दीपक पाटील विभागीय व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनी, डी के जेजुरकर जिल्हा कृषी अधिकारी बीड, उद्धव घोडके शेतकरी प्रतिनिधी, धनंजय गुंदेकर शेतकरी प्रतिनिधी व जगदीश फरताडे शेतकरी प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्य तक्रार निवारण समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड व वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत 2020 खरीप पिक विमा नुकसान भरपाई भारतीय विमा कंपनीने द्यावी अशा प्रकारचा निर्णय झाला, तसे निर्देश प्रधान सचिव कृषी यांनी भारतीय विमा कंपनीला दिले.या निर्णयाच्या विरोधात कृषी विमा कंपनीने कुठलेही अपील अद्याप पर्यंत दाखल केले नाही. असे असताना विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. मी स्वतः याअगोदर दोन वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विनंती केली. त्यांनी देखील प्रधान सचिव कृषी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव कृषी यांना देखील अनेक वेळा भेटून याबाबत ठोस भूमिका घ्या अशी मागणी केली.विमा कंपनीच्या अधीकाऱ्यांनाही भेटून विनंती केली. असे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई पासून वंचित असल्यामुळे आमदार लक्ष्मण पवार यांनी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांची दिनांक 13/09/2023 बुधवार रोजी भेट घेतली.लवकरात लवकर लोकप्रतिनिधी,प्रधान सचिव कृषी, विमा कंपनीचे आधिकरी समंधित अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घ्या. खरीप 2020 पिक विमा देण्यासंदर्भात राज्य तक्रार निवारण समितीच्या निर्णयानुसार तात्काळ आमालबजावनी करून लोकांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला द्या.अन्यथा मला मंत्रालयात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी ठोक भूमिका मांडली.कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तात्काळ बैठक लावण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.