मुख्यमंत्री भेटीच्या लेखी आश्वासनानंतर अखेर अहमदनगर मधील नाभिक समाजाचे उपोषण मागे

0
1836

प्रतिनिधी : संजय पंडित.

दि.१४,अहमदनगर :श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी पासून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विकासजी मदने, जिल्हाध्यक्ष शांतारामजी राऊत, शिवाजी दळवी, अजय कदम आणि अरुण वाघ यांनी नाभिक समाजाचा एस सी प्रवर्गात (अनुसुत जाती) समावेश व्हावा
यासाठी गेले चार दिवस आमरण उपोषणास बसले होते.
काल गुरुवारी दिवसभरात अनेक घडामोडींना वेग आला होता. याच दरम्यान उपोषणकर्त्यांच्या तब्येतीही खालवलेल्या होत्या. विकास मदने यांचा बीपी वाढल्याने दवाखान्यात ऍडमिट करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.
परंतु शेवटच्या श्वासापर्यंत उपोषणाला बसलेली जागा सोडणार नाही असा निर्धार करून त्यांनी समाजाला विश्वास दिला. त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील यांनी फोनवरून शांतारामजी राऊत यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री यांच्या बरोबर बैठक करून देण्याचे आश्वासन आणि माननीय जिल्हाधिकारी यांना तसे पत्र उपोषण स्थळी पोहोचवण्याचे आदेश दिले. साधारण दि.२१ किंवा २२ सप्टेंबर या एक-दोन दिवसांमध्ये मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री यांच्या दालनात नाभिक समाजाची एस सी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठीची बैठक होईल. असे लेखी पत्र उपजिल्हाधिकारी यांनी स्वतः असे पत्र उपोषण स्थळी येऊन दीले.
त्यामुळे पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
दरम्यानआज दिवसभरात प्रदेश महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, प्रदेश सहसचिव सयाजी झुंजार, प्रदेश सचिव दिलीप अनार्थे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मारुती टिपगूडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद, सांगली जिल्हाध्यक्ष जयवंत सूर्यवंशी, तसेच मा.प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे हे देखील फोनवरून सतत संपर्कात होते.यांच्यासह महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील असंख्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासन आणि समाज यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका आमदार संग्राम भैय्या जगताप, भाजपा चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर, सरचिटणीस अनंत देसाई, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्याम पिंपळे, पत्रकार विठ्ठल लांडगे यांनी अतिशय निर्णायक भूमिका बजावली. आज दीवसभरात खूप समाज संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यानी उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला तर नगर शहरातील सर्वच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here