— शिक्षणप्रेमीं व समाज बांधवाच्या मदतीची आजही गरज
बीड,, दि.12( प्रतिनिधी ) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा नोबेल हजारे हा उच्च शिक्षणासाठी विदेशात रवाना झाला असून, शिक्षणप्रेमी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यास शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या, नोबेलला विदेशातील शिक्षणासाठी मदतीची गरज असून, शिक्षणप्रेमी व समाजबांधवानी त्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन बीडकर शिक्षणप्रेमींनी केले आहे .
तैवानमधील एनडीएचयु विद्यापिठात संशोधनासाठी गेलेल्या नोबेल हजारे यांना पुढील शिक्षणासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री धनजंय मुंडे यांच्यासह बीड, औरंगाबाद, नगर, कल्याण, मुंबई येथील विविध पत्रकार संघटनांनी व बीड जिल्हयातील शिक्षणप्रेमी मंडळीने त्यास शुभेच्छा दिल्या, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यास निरोप देण्यात आला, यावेळी हजारे परिवार, नातेवाईक व विविध क्षेत्रातील शेकडो जण उपस्थित होते. नोबेल हजारे हा तैवानमध्ये पोहचताच, शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी त्याचे भव्य स्वागत केले. जाण्यापुर्वी सिरसमार्ग, कोळगाव , पाथर्डी, नगर, उल्हास नगर, ठाणे येथे विविध संघटना व मान्यवरांनी त्याचा सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.