गेवराई येथील राष्ट्रीय लोक अदालतीत २२६ प्रकरणे सामोपचाराने मिटली

0
245

गेवराई (प्रतिनिधी ) -महाराष्ट्र विधी सेवा समिती प्राधिकरण मुबंई व बीड जिल्हा विधी सेवा समिती बीड यांचे निर्देशानुसार गेवराई तालुका विधी सेवा समिती आणि गेवराई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९सप्टेंबर २०२३ रोजी गेवराई न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे मिळून ४२०३ प्रकरणे तसेच ४६२५ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती .त्यापैकी प्रलंबित १२१ दिवाणी व फौजदारी ३६ तसेच दाखल पूर्व ६९प्रकरणे असे एकूण २२६ प्रकरणे निकाली निघाली. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणात 12088921 रुपये वसूल झाले. या लोक अदालत मध्ये तीन पॅनल करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश क.स्तर के.एन.मराठे ,सह दिवाणी न्यायाधीश , एन.ए.रणदिवे , 2 रे सह दिवाणी न्यायाधीश व आर. आर .जाधव ४ थे सह दिवाणी न्यायाधीश यांनी काम पाहिले. या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित दिवाणी दावे , दाखल पूर्व प्रकरणे , धनादेशची प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, ग्राम पंचायत प्रकरणे, नगर पालिका प्रकरणे, पोटगी प्रकरणे, ट्राफिक चलन प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आप आपसात मिटविण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होणेसाठी न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, व सदस्य, सर्व बँकांचे अधिकारी, पोलीस प्रशासन, नगर पालिका, व न्यायालयातील सर्व कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here