गेवराई पोलीस स्टेशन समोर गर्दी
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील मादळमोळी या परिसरात ईटकुर येथे बांधकाम मजूर कामगाराचा काम करत असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली, हा मृत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त असे की हनुमान विष्णू आव्हाड वय वर्ष 22 राहणार खामगाव ह.मु. संजय नगर असे मयताचे नाव असून गेवराई शहरातील एका कन्ट्रक्शन वर नेहमीप्रमाणे काम करणारा मजूर कामगाराचा मृत्यू संशयित झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन येथे नातेवाईकासह गावकऱ्यांनी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी बळजबरीने कामाला नेले मयत व्यक्ती कुटुंबातील कर्ता पुरुष असल्याने परिवारातील छत्र हरपले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे सदरील संबंधित आरोपीच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.